Wednesday, 12 September 2012

राज्य स्तरीय उद्योग मित्र समिती सभा



जळगांव, दि. 12 -  राज्य स्तरीय अद्योग मित्र समितीची बैठक दिनांक 25 सप्टेंबर 2012 रोजी मुंबई येथे  विकास आयुक्त (उदयोग) तथा अध्यक्ष, उद्योग मित्र यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यस्तरीय महामंळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शासनाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहातील. उद्योजकांना आणि संघटनांना बैठकीच्या कार्यसुचीवर घ्यावयाचे प्रश्न व त्याची परिपूर्ण माहिती    सुनिल महाजन, निमंत्रक उद्योग मित्र यांचे नांवे उद्योग संचालनालय, नविन प्रशासन भवन, दुसरा मजला, मंत्रालयासमोर मुंबई 400 032 (दुरध्वनी क्रमांक 022 -22026755 किंवा फॅक्स क्रमांक 022-22026826 Email: diumitra@maharashtra.gov.in येथे (मराठी फॉन्ट DVB – TTSurekh मध्ये ) दिनांक 15 सप्टेंबर 2012 पर्यंत कार्यालयास पोहचेल अशी पाठविण्यात यावी . या तारखेपर्यंतच प्राप्त होणा-या प्रश्नांचा समावेश कार्यसुचीवर होईल याची नोंद  घ्यावी अधिक माहितीसाठी  वा. दौ. देसले, उदयोग उपसंचालक (उमि) यांचेशी दुरध्वनी क्रमांक 022 – 22044107 वर संपर्क साधावा.   
                                             0 0 0 0 0

No comments:

Post a Comment