Monday, 10 September 2012

कापुस व सोयाबीन किड रोगाविषयी मार्गदर्शन सल्ला


जळगांव, दि. 10 :- जळगांव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यातील कापुस व सोयाबीन हे पिक मोठया प्रमाणात घेतले जाते शासनाने या पिकांचे सर्वेक्षक करणेसाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सध्यास्थितीत कापुस व सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला  आहे. किड रोग नियंत्रणासाठी कृषि विभागाने कृषि विषयक सल्ला व उपाययोजना सुचविल्या आहेत त्या अशा..
कापुस पांढरी मांशी किड रोग नियंत्रणासाठी - व्हर्टीसिलीयम किंवा बिव्हेरीया 40 ग्रॅम किंवा निमतेल 50 मि.ली + 10 ग्रॅम धुन्याची पावडर 10 लिटर पाण्यात फवारावे.
            सोयाबीन  स्पोडोप्टेरा  किड रोग नियंत्रणासाठी - SINPV 250 एल ई. प्रति हेक्टर किंवा बिव्हेरीया 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यात सापेक्ष आद्रता 75% पेक्षा जास्त असल्यास फवारावे किंवा 5% निंबोळी अर्क फवारावे.                
               सोयाबीन  उंटअळी  किड रोग नियंत्रणासाठी  - प्रति एकर 8-10 पक्षीथांबे शेतात लावावेत. 5% निबोळी अर्क किंवा बिव्हेरीया 40 ग्रॅम किंवा बी. टी 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात फवारावे. असे उपविभागीय अधिकारी, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वे कळविले आहे.   

* * * * * * * * * 
²ÖÖŸÖ´Öß ÜÖÖ¡Öß“Öß . . .  ´ÖÖׯüŸÖß ¯ÖÏÝÖŸÖß“Öß . . . ¾Öê¬Ö ³Ö×¾ÖµÖÖ“ÖÖ . . .

No comments:

Post a Comment