मुंबई, दि. 11: महाराष्ट्र राज्य
हिंदी साहित्य अकादमीच्यावतीने हिंदी साहित्यासाठी देण्यात येणाऱ्या 2010-11 च्या
पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण 14 सप्टेंबर, 2012
रोजी सायंकाळी 6.00 वाजता इंडियन मर्चंट चेंबर्सचा वालचंद हिराचंद हॉल, चर्चगेट,
मुंबई येथे करण्यात येणार आहे.
अखिल
भारतीय स्तरावरील भारतीय हिंदी सेवा पुरस्कार मुंबईचे डॉ. जगदंबा प्रसाद दिक्षित
यांना तर डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारती हिंदी सेवा पुरस्कार मुंबईचे
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची
रक्कम एक लाख रुपये आहे.
राज्यस्तरीय
पुरस्कार
राज्यस्तरीय
पुरस्कारासाठी आठ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता
पुरस्कार- डॉ. सूर्यबाला (मुंबई), साने गुरुजी राष्ट्रीय एकता पुरस्कार - प्रा.
सु.मो.शाह (पुणे), पद्मश्री
अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार - डॉ. विजयकुमार (नवी मुंबई), डॉ. उषा मेहता
हिंदी सेवा पुरस्कार - श्रीमती लीना मेंहदळे ( पुणे), गजानन माधव मुक्तिबोध मराठी
भाषी हिंदी लेखक पुरस्कार
- डॉ. निशिकांत ठकार (सोलापूर), कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार
- श्रीमती सुधा अरोडा (मुंबई), व्ही.शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा
पुरस्कार - श्री. रमेश राजहंस (मुंबई), सुब्रमण्य भारती हिंदी सेतु विशिष्ट सेवा
पुरस्कार - श्रीमती अचला नागर (मुंबई) यांना
देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी 51 हजार रुपये आहे.
विधा
पुरस्कार
विधा
पुरस्कारासाठी बारा व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
काव्य
प्रवर्ग - संत नामदेव पुरस्कार - श्री. चंद्रकात पाटील (औरंगाबाद), श्री. कुमार
शैलेन्द्र (अंधेरी), श्री. सुरेश
कुसूंबीवाल (जि.जळगाव) ; उपन्यास प्रवर्ग -
जैनेन्द्र कुमार पुरस्कार - डॉ. कृष्णा श्रीवास्तव (नागपूर ) ; कहानी प्रवर्ग - मुंशी प्रेमचंद पुरस्कार - डॉ.
आशा पांडेय (अमरावती) ; निबंध प्रवर्ग -
आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार - श्री. ओमप्रकाश शिव (नागपूर) व श्री. नारायण कदम
(पनवेल) ; समीक्षा प्रवर्ग -
आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार - डॉ. विजया (नवी मुंबई) व डॉ. हणमंतराव पाटील
( औरंगाबाद) ; अनुवाद प्रवर्ग - मामा
वरेरकर पुरस्कार - डॉ. सुनील देवधर( पुणे) ; वैज्ञानिक तकनीकी
प्रवर्ग- होमी जहांगीर भाभा पुरस्कार - डॉ. रमाकांत शर्मा (मुंबई) ; हिंदी भाषा संबंधी लेखन - पंडीत महावीर प्रसार
द्विवेदी पुरस्कार - डॉ. करुणाशंकर उपाध्याय (मुंबई)
सर्व
पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा महाराष्ट्र राज्य साहित्य
अकादमीचे अध्यक्ष संजय देवतळे यांनी अभिनंदन केले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment