Friday, 28 September 2012

जळगांव जिल्हा पीक कर्ज वाटपात प्रथम राहील . .जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर



 
जळगांव , दिनांक 28 :- जिल्हयातील सर्व बॅका त्यांना कर्ज पुरवठयाबाबत दिलेल्या उदिष्टांच्या पूर्तीकरिता चांगल्या पध्दीतीने काम करत असून मागील वर्षाप्रमाणे सन 2012-13 मध्येही जळगांव ‍िजल्हा राज्यात पीक कर्ज वाटपात पहिल्या क्रमांकावर राहील असे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सांगितले. ते आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय ऋण समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते.
            यावेळी जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक अविनाश आठल्ये, आरबीआय चे आर.बी. पंचगम, नाबार्डचे प्रतिनिधी जी.एम.सोमवंशी ,  जिल्हा उपनिबंधक सुनिल बनसोडे, विशेष समाज कल्याण अधिकारी व्ही.ए.पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त श्री. फालक आदिसह राष्ट्रीयकृत बॅकांचे प्रतिनिधी व जिल्हयातील विविध महामंडळाचे व्यवस्थापक उपस्थित होते.
            प्रारंभी जिल्हाधिकारी राजुरकर यांनी जिल्हयातील वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले  मागासवर्ग विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळ, चर्मोद्योग विकास महामंडळ आदिनां सन 2012-13 या आर्थिक वर्षात देण्यात आलेल्या उदिष्ट पूर्तीचा आढावा घेतला  व ते पूर्ण करतांना बॅकाकडून येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या सदरच्या महामंडळांनी बॅकांकडे असलेली विविध प्रकरणे लवकर मंजूर करण्याची सूचना श्री. राजूरकर यांनी बैठकीत उपस्थित बॅकेच्या प्रतिनिधींना केली. तसेच उदिदष्ट पूर्तीकरिता महामंडळांना पाठपुरावा करावा असेही त्यांनी सांगितले.
            अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक श्री. आठल्ये यांनी जळगांव जिल्हा वार्षिक ऋण योजना सन 2012-13 करिता 3 हजार 46 कोटी 11 लाख रुपयांचे उदिदष्ट असल्याची माहिती दिली. सन 2011-12 मध्ये 2 हजार 365 कोटी च्या उदिदष्टांपैकी 2 हजार 171 कोटीची पूर्तता करण्यात आली होती. तसेच 2012-13 च्या उदिदष्टांची जून 2012 पर्यत 66% पूर्तता झाल्याची माहिती त्यांनी दिली.
            यावर्षी खरीप पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट 1 हजार208 कोटी होते. परंतु जिल्हयात ते खरीप हंगामात 1 हजार 273 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये सेंट्रल बॅक ऑफ इंडिया, स्टेट बॅक,देना बॅक, युनियन बॅक व  पंजाब नॅशनल बॅकांनी शंभर टक्के पेक्षा अधिक उदिदष्ट पूर्ण केलेले आहे. तर जळगांव जिल्हा सहकारी बॅकेने 108% पीक कर्ज उदिदष्ट पूर्तता केल्याची माहिती श्री. आठल्ये यांनी बैठकीत दिली.
            महाराष्ट्र बॅकेमध्ये जिल्हयातील 16 हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी झिरो बॅलन्सचे ॲकाऊंट काढले असले तरी त्यापैकी  सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांच्या आकाऊंटला बॅकेने चार्जेस लावून विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रक्कम कपात केल्याची तक्रार समाज कल्याण अधिकारी यांनी केली. त्याविषयी महाराष्ट्र बॅकेने तात्काळ कार्यवाही करुन विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम परत करण्याची सूचना श्री. राजूरकर यांनी केली.
            यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते वार्षिक ऋण योजना सन 2012-13  या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सदरची पुस्तिका  जळगांव जिल्हा अग्रणी  बॅक म्हणून कार्य करणाऱ्या सेंट्रल बॅक ऑफ इंडिया ने  प्रकाशित केली आहे.

No comments:

Post a Comment