मुंबई, दि. 27 : राज्यातील अल्पसंख्याक बहूल खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये
पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 2 लाख रुपये अनुदान
योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 ऑक्टोबर 2012 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची
माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी दिली. सध्या ही
मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती.
खासगी अल्पसंख्याक बहूल शाळांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे
आवाहनही श्री. खान यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर
पर्यंत होती. पण मुदतीत अर्ज करु न शकल्याने अनेक संस्थांनी या योजनेसाठी अर्ज
करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता अर्ज करण्यासाठी 30
ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ
मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करता येईल. या अनुदानातून अल्पसंख्याक
बहूल खासगी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, संगणक कक्ष, ग्रंथालय,
वर्ग खोलीचे बांधकाम आदी पायाभूत सुविधा उभारता येऊ शकतात.
No comments:
Post a Comment