जळगांव, दि. 26 :- सनदी सेवा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचे विशेषत:
दुर्बल घटकातील युवकांचे प्रतिनिधीत्व वाढावे, या हेतूने अनुसूचित जाती उप –
योजनेतंर्गत scsp मे
2006 पासून यशदा , पुणे येथे डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अशाप्रकारे
केंद्रातर्फे दरवर्षी 70 उमेदवारांना मोफत निवास, विदयावेतन, ग्रंथालय, अभ्यासिका,
संगणक व सनदी सेवा परीक्षेच्या सर्व टप्प्यांसाठी विषयवार मार्गदर्शन दिले जाते.
सन 2012 – 2013 या
शैक्षणिक वर्षाकरीताच्या कोचिंग कार्यक्रमासाठी उमेदवार निवडीकरीता या
केंद्रातर्फे रविवार दि. 28 ऑक्टोंबर 2012 रोजी 11 ते 1 या वेळेत राज्यस्तरीय
प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
28 सप्टेंबर 2012 पर्यंत आहे. या प्रवेश परीक्षेसंबंधीची जाहिरात केंद्रातर्फे
विविध वर्तमान पत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच या विषयाची तपशिलवार माहिती,
पुस्तिका तसेच प्रवेश अर्ज केंद्राच्या संकेतस्थळावर www.yashada.org/aces व www.geexam.com उपलब्ध करण्यात आलेली आहे. या प्रवेशपरीक्षेची
सर्व संवर्गातील पात्र उमेदवारांसाठी रु 325 /- इतके शुल्क आकारण्यात आलेले आहे.
No comments:
Post a Comment