मुंबई, दि. 20 : सोशल नेटवर्कींग साईट्सच्या
माध्यमातून मुस्लिम विरोधी चित्रपटाचा प्रसार करण्यामागे धार्मिक तेढ वाढविण्याचे
षडयंत्र आहे. राज्यातील मुस्लिम समाजाच्या तीव्र भावना आपण केंद्रीय
गृहमंत्र्यांपर्यंत स्वत: पोहोचविल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांनी केंद्राच्या
कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टिमला (DG-CERT) अशा
प्रकारच्या वादग्रस्त चित्रफिती व कार्टून्स बंद करण्याची विनंती केल्याचे
मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्री त्याचप्रमाणे गृहमंत्री आर.आर.पाटील
यांनी आज तातडीने मुंबईतील मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची व प्रसार
माध्यमांच्या संपादकांची बैठक बोलावून या वादग्रस्त चित्रफितीमुळे शांतता भंग
होणार नाही याची काळजी घेण्याची त्याचप्रमाणे राज्य सरकार यासंदर्भात करीत
असलेल्या कारवाईची माहिती मुस्लिम समाजाला देण्याची विनंती उर्दू माध्यमांनी
वर्तमानपत्रातून त्याचप्रमाणे उद्याच्या नमाजाच्या प्रसंगी मशिदीमधून देण्याची
विनंती केली.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास उपस्थित
धार्मिक नेत्यांना त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे या विषयी राज्य सरकार करीत असलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त
केले. उद्या शुक्रवारी नमाजाच्या वेळी
या संदर्भातील शांततेचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
|
समाजविघातक
घटकांनी अशा पध्दतीने दुफळी माजेल या उद्देशाने केलेल्या या अतिशय विकृत कृतीचा
राज्य सरकार निषेध करीत असून या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रसारणामुळे भारतातील
सामाजिक सौहार्द बिघडण्याची शक्यता असल्याने अशा साईटसवर केंद्र सरकारने तात्काळ
बंदी घालावी, अशी विनंती आपण नुकतीच केंद्रीय गृहमंत्री
सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करून केली आहे. त्याचप्रमाणे गुप्तचर विभाग,
परराष्ट्र सचिवालय यांच्याशी देखील राज्यशासन सातत्याने संपर्कात आहे, असे
मुख्यमंत्री म्हणाले.
केवळ मुंबईच
नव्हे तर राज्यात सर्वत्र पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाचे नेते व मौलवींशी
चर्चा करून त्यांच्या भागात शांतता कशी राहील याची काळजी घेण्याचे निर्देशही
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
वादग्रस्त-सोशल
नेटवर्कींग साईट्स ब्लॉक करण्याची कार्यवाही केंद्र शासनाच्या मदतीने करण्यात येत
असून राज्यात अशा धार्मिक तेढ वाढविणाऱ्या या चित्रफितींचा प्रसार करणाऱ्यांवर
कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती देखील
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रात विविध जातीधर्माचे, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
धार्मिक किंवा भावनिक कारणांवरुन या सलोख्याला धोका पोहचू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे आवाहन या प्रसंगी गृहमंत्री
आर.आर.पाटील यांनी केले.
या
बैठकीत महेमूद दर्याबादी, सर्फराज आरझू, एम.एन.खालीद, डॉ.अजीमुद्दीन, हसन कमाल,
झहीर अब्बास, महम्मद रिझवान, अब्दूल सलाम, खान कासमी आदींनी या बैठकीत आपल्या
सूचना केल्या.
बैठकीस
गृहविभागाचे अपर मुख्य सचिव अमिताभ राजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजित कुमार
जैन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग आदी पोलीस अधिकारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment