Monday, 10 September 2012

पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी करा : गृहमंत्री आर.आर.पाटील


नाशिक, दि. 10 :-  महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मधुन खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन पोलीस दलात दाखल होतांना, अधिकारी म्हणून समाजात वावरतांना पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी करा तसेच आपल्या वर्दीशी  व कर्तव्याशी  इमान राखून स्वत:शी प्रामाणिक रहा असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री   आर. आर. पाटील  यांनी  केले.
            येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनिच्या 106 व्या तुकडीच्या दिक्षांत समारंभात  ते बोलत होते. यावेळी   राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल,  महाराष्ट्र पोलीस  प्रबोधिनीचे संचालक संजय  बर्वे  ,विशेष पोलीस महानिरिक्षक धनंजय कमलाकर,  पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल , पोलीस अधिक्षक  (ग्रामीण ) प्रविण पडवळ , वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
            गृहमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, पोलीस दलात  प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अधिका-यांचे स्वागत असून खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन राज्याच्या महत्वपूर्ण सेवेत आपण पदार्पण केले आहे  कायदा व सुव्यवस्था राखणे, देशाच्या सिमेचे रक्षण करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेचदेशांतर्गत  व राज्यांतर्गंत सुरक्षा महत्वाची आहे. दहशतवाद, नक्षलवाद यांचंशी  सक्षमपणे मुकाबला करणारे   पोलीस दल हे महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे दल आहे. आव्हाने नेहमी येतात ती ‍िस्वकारुन त्यांचा सक्षमपणे मुकाबला करा, व आपल्या कर्तव्यात कोणताही कसुर ठेवू नका, आपणाकडुन  समाजाला खुप अपेक्षा आहेत त्या पुर्ण करा अशी  अपेक्षा त्यांनी यावेळी  व्यक्त केली. महिला अधिका-यानी  चांगले काम करुन दाखविले आहे  त्यांच्याकडून सुध्दा समाजाला  व पोलीस खात्याला खूप अपेक्षा आहेत. प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट प्रशिक्षाणार्थी म्हणून  हर्षदा दगडे, या महिला अधिका-याचे  त्यानी  कौतुक केले. या प्रबोधिनितून प्रशिक्षणाचे  चांगले अनुभव घेऊन बाहेर पडणारे  पोलीस  अधिकारी   आपल्या जीवनात निश्चितच यशस्वी होतील अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली.
            राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल आपल्या मनोगतात म्हणाले की, पोलीस दलाच्या  बोधवाक्यानुसार कुठल्याही दबावाला  बळी  न पडता  कायद्याचा मार्ग स्विकारुन गुन्हेगारांवर कारवाई करा, अशी खात्याची  आपणाकडून अपेक्षा आहे, येणारा काळ हा खडतर असुन आव्हांनाचा आहे. पोलीस दलास त्यास सामोरे जावे लागणार आहे, आपल्या कर्तव्यासोबतच आरोग्यही जपा, चांगले काम करा, खात्याची प्रतिमा उंच करा,  अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली.
             यावेळी  गृहमंत्री आर. आर. पाटील यांना  प्रशिक्षण पुर्ण केलेल्या  पोलीसांनी मानवंदना दिली. प्रशिक्षार्णीर्थी पोलीस अधिका-यांना यावेळी   शपथ  देण्यात आली.  
            प्रशिक्षण पुर्ण केलेल्या  16 पोलीस अधिका-यांना गृहमंत्री  श्री. पाटील यांचे हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये बेस्ट ट्रेनि ऑफ बॅच (स्वार्ड ऑफ ऑनर) हर्षदा बाळासाहेब दगडे या महिलाअधिका-यास  चषक देऊन गौरविण्यात आले. पुरुष अधिका-यामध्ये  मनोज  चौधरी यांना व्दितीय क्रमांकाच्या बेस्ट ट्रेनि ऑफ बॅच या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  या 106 व्या पोलीस प्रशिक्षण तुकडीत एकुण  532 प्रशिक्षाणार्थींनी  प्रशिक्षण पुर्ण केले.
             कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रबोधनिधीचे संचालक संजय बर्वे यांनी  केले. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी पोलीस अधिका-यांचे कुटुंबिय , पोलीस अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

* * * * * * *

No comments:

Post a Comment