जळगांव, दि. 11- जिल्हयात जवाहर नवोदय विद्यालय
हे भारत सरकार संचालित CBSE पाठयक्रम असणारे ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी
दर्जेदार अद्यावत शिक्षण देणारे जिल्हयातील एकमेव निवासी विद्यालय आहे सदरच्या
विदयालयात प्रवेशाकरिता निवड चाचणी परीक्षा पात्र ठरल्यास इयत्ता 6 वी ते 12 वी
पर्यत मोफत शिक्षणाची व्यवस्था आहे. निवड चाचणी परीक्षा दि.10 फेबुवारी 2013 रोजी
जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या नियोजीत परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी छापील अर्ज विनामूल्य उपलब्ध आहे संपूर्ण भरलेला अर्ज विद्यार्थी
ज्या शाळेत इयत्ता 5 वीत शिकत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत मा.
गटशिक्षणाधिकारी याचेकडे दि.01 ऑक्टोंबर 2012 पूर्वी पाठविण्याचे आवाहन प्राचार्य
बी. नारायण राव यांनी केले आहे.
या विषयी अधिक माहितीकरिता 02582 / 222132 या दूरध्वनी क्रमाकावर संपर्क
साधावा
No comments:
Post a Comment