Monday, 17 September 2012

तोंडापूर ग्रामपंचायतीने समतोल विकासाकरिता आराखडा सादर करावा .. जे.पी. डांगे, अध्यक्ष, राज्य वित्त आयोग


        जळगांव, दिनांक 17:- ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावगाडा हाकला जात असल्याने गावाच्या समतोल विकासाकरिता सर्वसमावेशक आराखडा वित्त आयोगाकडे सादर केल्यास ग्रामपंचायतीला भरीव सहकार्य करण्याचे आश्वासन वित्त आयोगाचे अध्यक्ष, जे.पी.डांगे यांनी केले.  ते तोंडापूर (ता. जामनेर) येथील ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करत होते.
            यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जामनेर गटविकास अधिकारी अतुल पाटील, प्रकल्प अधिकारी ( न.पा.) बी.टी. बावीस्कर, सरपंच सुनिल कालविले, जिल्हा बॅकेचे संचालक दिगंबर पाटील, ग्रामसेवक ऐ.एस.पालवे, आदि सह सर्व सदस्य  व ग्रामस्थ उपस्थित होते.
            ग्रामस्थांच्या मागण्या:- ग्रामविकासाकरिता स्वतंत्र निधी नसल्याने गावे विकासापासून दूर आहेत.  त्यामुळे निधी उपलब्ध करावा.  घरकुल योजनेंतून मिळणारा 70 हजार रु. निधी अपुरा असल्याने तो एक ते दीड लाखापर्यत मिळावा. पाणी पटटी वसुलीची 40-50 % रक्कम ग्रामपंचायतीला मिळावी. तोंडापूर गावांमधील 13-14 व्या शतकातील अंबादेवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास करावा.  ग्रामपंचायतीतील विकासाकरिता विशेष पॅकेज देण्याची मागणी . तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आदि पदाधिकाऱ्यांना वाढीव सभा भत्ता व मानधन द्यावे. शौचालय बांधण्याकरिता दिला जाणारा निधी तुटपुंजा असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
            ग्रामीण भागात पाणी , गटारी, शौचालय, आरोग्य, शिक्षण अशा मुलभूत गरजा पुरविणे ग्रामपंचायतीचे काम आहे.  अशा मुलभूत सोयी-सुविधा देण्याकरिता आवश्यक असलेला निधी पुढील पाच वर्षाचे नियोजन करुन  मागणी करावी. सदरचा अहवाल, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेमार्फत वित्त आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन श्री. डांगे यांनी केले.  तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचयातीला विकासाकरिता विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
            सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक ए.एस.पालवे यांनी केले तर आभार सरपंच सुनिल कालविले यांनी मानले.

No comments:

Post a Comment