जळगांव दिनांक 7:-जळगांव जिल्हयाती पुर्णा नदी क्षेत्रात जोराचा पाऊस झाल्याने मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नदी क्षेत्राच्या कडेच्या गावांमध्ये पूर परिस्थती निर्माण झालेली आहे. त्याभागाची पाहणी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी करुन प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
तसेच नदी काठच्या नुकसान झालेल्या घरांचे पुर्नवसनाबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. देवकर यांनी यावेळी मुक्ताईनर तालुक्यातील बेलसवाडी, पातोंडी, अंतुर्ली, पिंप्रीनांदू या गावात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तसेच रावेर तालुक्यातील निंभोरासिम, ऐनपूर , निंबोल, विठावे या गावांची पाहणी केली.
भुसावळचे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गांवात झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्र्यांना दिली. यात रावेर तालुक्यातील पिकांचे व घरांचे जास्त नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
रावेर तालुक्यातील अजनाड, अटवाडे, खिरवड, निंभोरासीम, निंबोल, विटवे, ऐनपूर या गावांतील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली आली असून रावेर तालुक्यातील अजनाड –6, निंबोळ-11, खिरवड –12 व ऐनपूर -2 असे एकुण 31 कुटूंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.
रावेर तालुक्यातील आठ गावांमधील 94 घरांचे नुकसान झाले आहे. अजनाड-आठ, निंबोल -12, खिरवड-12, कुसुंबा-8, लालमाती-4, विविडया-6, आभोरा- 4 व निंभोरसिम- 40 या गावांचा समावेश आहे.
यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत ॲड रविंद्र भैया पाटील, माजी आ. अरुण पाटील, , राष्ट्रवादी जिल्हा समन्वयक विलास पाटील रावेरचे तहसिलदार बबनराव काकडे व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
²ÖÖŸÖ´Öß ÜÖÖ¡Öß“Öß . . . ´ÖÖׯüŸÖß ¯ÖÏÝÖŸÖß“Öß . . . ¾Öê¬Ö ³Ö×¾ÖµÖÖ“ÖÖ . . .
No comments:
Post a Comment