जळगांव,
दि. 1 :- केंद्रिय अर्थसाहाय्य योजनेतून धरणगांव तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील
14 कुटुंबियांना आज धरणगांव तहसिल कार्यालयातील सभागृहात राज्याचे कृषि
राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांच्या हस्ते
प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यांत आले तसेच यावेळी
आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या
कुटुबियांना 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रारंभी धरणगांवचे तहसिलदार
महेंद पवार यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले, केंद्रिय कुटुंब
अर्थसाहाय्य योजनेंअतर्गत दारिद्रय रेषेखालील
कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास शासनाकडून 10 हजाराचे अर्थसाहाय्य दिले जाते.
असे सांगून तालुक्यातील 14 कुटुंबियांना ऑगस्ट 2012 मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना
हे धनादेश वाटप करण्यात येत आहेत. धनादेश वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची नावे
खालील प्रमाणे .
श्रीमती शोभा कडु पाटील - धरणगांव,
श्रीमती भारतीबाई राजेंद्र पाटील – आव्हाणी, श्रीमती कस्तुराबाई सखाराम मोरे –
चांदसर, श्रीमती कल्पनाबाई देवराम भिल – जांभोरे, श्रीमती सीमा संजय पाटील –
चोरगांव, श्रीमती विमलबाई मधुकर चौधरी – धरणगांव, श्रीमती बाजबाई प्रल्हाद भिल –
चांदसर, श्रीमती मंगलाबाई वसंत शिंदे – सोनवद खु, श्रीमती जैयवंताबाई राजु भिल –
गारखेडे, श्रीमती कासुबाई गोपीचंद भिल – चावलखेडा, श्रीमती संगीता सुभाष जगताप –
धरणगांव, श्रीमती अरुणाबाई वसंत पाटील – धरणगांव , श्रीमती सुनंदाबाई गजानन भावसार
– धरणगांव, श्रीमती निर्मला सुनिल कुलट - धरणगांव .
या कार्यक्रमास जिल्हा बॅकेचे संचालक
वाल्मीक पाटील, विलास पाटील, लिलाधर तायडे, नायब तहसिलदार एस.पी.मांडोळे, आर.डी.
कोळी आदि मान्यवर उपस्थित होते.
* *
* * * *
No comments:
Post a Comment