जळगांव. दि. 19 :- आदिवासी उमेदवारांकरिता
रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केद्र, रावेर जि. जळगांव येथे दिनांक
1/12/2012 पासून 82 वे प्रशिक्षण सत्र सुरु होत आहे.
प्रशिक्षणांत
आदिवासी उमेदवारांना विविध संस्थामार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा (
इंग्रजी / सामान्य ज्ञान / गणित / बौधिक चाचणी) परिक्षांची तयारी करुन
घेतली जाते. प्रशिक्षणाकरीता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमीत कमी एस. एस. सी.
पास व वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार आदिवासी ( अनु. जमाती) या
प्रवर्गाचा असावा. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिन्याचा असून प्रशिक्षण काळात
प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. 1000 /- विदयावेतन देण्यात येते.
या
प्रशिक्षणाकरिता इच्छूक उमेदवारांनी दिनांक 26 /11/2012 रोजी सकाळी 11-00 वाजता
आदिवासी उमेदवारांकरिता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट
नं. 2 शनि मंदीरामागे, स्टेशनरोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे मुलाखतीसाठी उपस्थित
रहावे. सोबत शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स
प्रती नांव नोंदणीचे ओळखपत्र आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो सोबत आणावेत. यापूर्वी
या कार्यालयामार्फत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मुलाखतीस येऊ नये.
प्रशिक्षणाच्या
साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:
करावी लागेल . मुलाखतीसाठी कोणताही प्रवास खर्च दिला जाणार नाही याची उमेदवारांनी
नोंद घ्यावी असे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी बी. व्ही. मोरे यांनी
एका पत्रकाव्दारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment