मुंबई, दि. 30 : उच्च व
तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शिक्षण शुल्क समितीमार्फत खाजगी
संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क निश्चित करण्यात आले असून
शैक्षणिक वर्ष 2009-10 पासून या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना
त्यापुढील शैक्षणिक वर्षी 7 टक्क्यांनी वाढीव शिक्षण शुल्क भरावे लागेल. ही दरवाढ
अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी लागू राहणार आहे.
जर
सन 2009-10 करिता शैक्षणिक शुल्क एक लाख रुपये व अभ्यासक्रम चार वर्षाचा असेल तर
सन 2010-11, 2011-12 व 2012-13 या कालावधीसाठी दरवर्षी एक लाख सात हजार इतके
शिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे.
शासनाने
सामाजिक मागास तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी लागू
केलेल्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सामाजिक न्याय, आदिवासी आणि उच्च
व तंत्र शिक्षण या विभागांनी शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित संस्थेकडे
करताना वाढीव प्रमाणात 7 टक्के शिक्षण शुल्क अदा करणे आवश्यक आहे.
हा
शासन निर्णय शिक्षण शुल्क समितीच्या पूर्वसहमतीने 7 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिध्द
झाला असून महाराष्ट्र शासनाच्या www. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. त्याचा संगणक सांकेतांक 201211071532200408 असा आहे.
No comments:
Post a Comment