जळगांव,
दि. 19 :- जळगांव जिल्हयात 20 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान साथरोग नियंत्रण
स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली
असून ती पुढीलप्रमाणे
साथरोग नियंत्रण व स्वच्छता पंधरवाडा मोहिमेत
राबविण्यात येणारे कार्यक्रम दिनांक 20
नोव्हेंबर 2012 रोजी पंचायत समिती सभापती, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच,
ग्रामसेवक, तलाठी, वैदयकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, केंद्रप्रमुख, अंगणवाडी
पर्यवेक्षीका, आशा गटप्रर्वतक, एनजीओ, आयएमये अध्यक्ष, नि. मा. अध्यक्ष सदर सभा
आमदारांचे अध्यक्षतेखाली होईल. त्यासाठी जबाबदार कर्मचारी / अधिकारी
/ पदाधिकारी पुढीप्रमाणे गटविकास अधिकारी / तालुका आरोग्य अधिकारी /
बालविकास प्रकल्प अधिकारी/ एकात्मिक बाल
विकास सेवा योजना गटशिक्षण अधिकारी असून जबाबदार सनियंत्रण अधिकारी तहसिलदार
राहतील.
दिनांक 21 नोव्हेंबर 2012 रोजी विशेष ग्रामसभा
(प्रत्येक गावांला) हॅन्ड बिल वाचन वाटप त्यासाठी
जबाबदार कर्मचारी / अधिकारी
/ पदाधिकारी पुढील प्रमाणे मुख्याधिकारी न. पा. , ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी ग्रामपंयात असून जबाबदार सनियंत्रण अधिकारी गट
विकास अधिकार / मुख्य अधिकारी राहतील.
दिनांक
22 नोव्हेंबर 2012 रोजी कोरडा दिवस पाळणे, पाण्याची भांडी घासून पूसून वाळविणे
त्यासाठी जबाबदार कर्मचारी / अधिकारी
/ पदाधिकारी पुढीप्रमाणे आरोग्य
कर्मचारी / ग्रामसेवक / तलाठी अंगणवाडी सेविका/ आशा व सर्व ग्रामस्थ/ न. पा.
कर्मचारी असून जबाबदार सनियंत्राण अधिकारी
म्हणून सरपंच / वैदयकिय अधिकारी / मुख्याधिकारी राहतील.
दिनांक 23 ते 28 नोव्हेंबर 2012 रोजी
शहर व गावातील परिसर व नाल्यांची स्वच्छता , गटारी साफ करणे त्यासाठी
जबाबदार कर्मचारी / अधिकारी
/ पदाधिकारी पुढीप्रमाणे ग्रामसेवक / सरपंच व सदस्य,/ न. पा. कर्मचारी असून जबाबदार सनियंत्रण अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी / मुख्याधिकारी राहतील.
प्रत्येक
घराचे सर्वेक्षण / रक्त नमुना व उपचार करणे, ॲबेट टाकणे, त्यासाठी जबाबदार कर्मचारी
/ अधिकारी / पदाधिकारी पुढीप्रमाणे
आरोग्य कर्मचारी संबंधित न. पा. आरोग्य कर्मचारी, असून जबाबदार सनियंत्रण अधिकारी वैदयकिय अधिकारी / तालुका आरोग्य अधिकारी / मुख्याधिकारी
राहतील,
दिनांक
29 नोव्हेंबर 2012 रोजी शाळेतील बालकांची
प्रभात फेरी व डेग्यू बाबतचे हॅन्डबिल वाचन व वाटप त्यासाठी जबाबदार कर्मचारी / अधिकारी
/ पदाधिकारी पुढीप्रमाणे उपशिक्षक
व मुख्याध्यापक असून जबाबदार सनियंत्रण अधिकारी
केंद्रप्रमुख व गटशिक्षण अधिकारी , कोरडा दिवस पाळणे, पाण्याची भांडी घासून पुसन वाळविणे
त्यासाठी जबाबदार कर्मचारी / अधिकारी / पदाधिकारी पुढीप्रमाणे आरोग्य कर्मचारी / ग्रामसेवक , अंगणवाडी
सेविका, आशा व सर्व ग्रामस्थ असून जबाबदार सनियंत्रण अधिकारी सरपंच / वैदयकिय अधिकारी
राहतील
दिनांक 30 नोव्हेंबर 2012 रोजी उकिरर्डे काढणे त्यासाठी जबाबदार कर्मचारी / अधिकारी / पदाधिकारी पुढीप्रमाणे सरपंच, ग्रामसेवक जबाबदार सनियंत्रण
अधिकारी गट विकास अधिकारी, गप्पी मासे
सोडणे त्यासाठी जबाबदार / कर्मचारी / अधिकारी
/ पदाधिकारी पुढीप्रमाणे आरोग्य कर्मचारी असून जबाबदार सनियंत्रण अधिकारी वै्दयकीय अधिकारी राहतील.
दिनांक 1
डिसेंबर 2012 रोजी राहिलेला परिसर स्वच्छ करणे त्यासाठी जबाबदार कर्मचारी / अधिकारी
/ पदाधिकारी पुढीप्रमाणे
ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ जबाबदार सनियंत्रण
अधिकारी गट विकास अधिकारी, सरपंच राहतील ,
दिनांक 2 डिसेंबर 2012 रोजी गावाची आढावा सभा
झालेल्या कामांचा नोंदी त्यासाठी जबाबदार कर्मचारी
/ अधिकारी / पदाधिकारी पुढीप्रमाणे
ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी जबाबदार सनियंत्रण अधिकारी सरपंच
दिनांक 3
डिसेंबर 2012 रोजी अहवाल तयार करणे त्यासाठी जबाबदार कर्मचारी / अधिकारी / पदाधिकारी पुढीप्रमाणे सर्व आरोग्य कर्मचारी / न पा कर्मचारी, वैदयकिय
अधिकारी यांना आपला अहवाल सादर करतील व वैदयकिय अधिकारी सर्व अहवाल गटविकास
अधिकारी यांना सादर करतील, जबाबदार सनियंत्रण अधिकारी गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , मुख्याधिकारी
दिनांक 4 डिसेंबर 2012 रोजी जिल्हास्तरावर अहवाल सादर करणे त्यासाठी
जबाबदार कर्मचारी / अधिकारी / पदाधिकारी पुढीप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी / गट विकास अधिकारी /
मुख्याधिकारी , जबाबदार सनियंत्रण अधिकारी तहसिलदार राहतील
No comments:
Post a Comment