जळगांव, दि. 28 :- जळगांव शहरातील पोलिस परेड
मैदान व क्रीडा संकुल मैदानावर दिनांक 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2012 या कालावधीत
सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून सदरच्या मेळाव्यास धुळे, नंदुरबार,
हिंगोली, नांदेड, जालना, परभणी, जळगांव, औरंगाबाद व बुलढाणा आदि नऊ जिल्हयातील
इच्छूक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.
सदरच्या
भरती मेळाव्यात सैन्य दलातील सोल्जर जी. डी. टेक्नीकल, सोल्जर जी. डी. महार,
सोल्जर क्लार्क, ट्रेडसमन, नर्सिग सहाय्यक आदि पदांसाठी उमेदवारांची निवड केली
जाणार आहे. तरी वरील सर्व जिल्हयातील इच्छूक
व आवश्यक असलेली शैक्षणिक व शारिरीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी पोलिस
परेड मैदानावर पहाटे 3 ते सकाळी 7 या
वेळेत उपस्थित राहावे. त्यानंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार नाही
याची नोंद घेण्याचे कळविण्यात येत आहे.
पोलिस
परेड मैदान व क्रीडा संकुलाचे मैदानावर होणारी सैन्य भरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे-
सोल्जर जी. डी., सोल्जर टेक्नीकल व सोल्जर
महार पदासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा (दि. 30 नोव्हेंबर), हिंगोली व नांदेड ( 1 डिसेंबर ), जालना व परभणी ( दि. 2 डिसेंबर ), जळगांव ( दि. 3
डिसेंबर), बुलढाणा ( दि. 4 डिसेंबर ) व औरंगाबाद ( दि. 7 डिसेंबर ) अशा प्रकारे भरती
प्रक्रिया संपन्न होईल.
तसेच
वरील नऊ जिल्हयासाठी दिनांक 7 डिसेंबर रोजी ट्रेडसमन पदाकरिता चाचणी होईल.
त्याचप्रमाणे सर्व जिल्हयांच्या उमेदवारांकरिता
दि. 8 डिसेंबर रोजी सोल्जर क्लार्क, सोल्जर टेक्नीकल, नर्सिग सहाय्यक पदांची भरती
केली जाणार आहे. तर शेवटी दि. 9 डिसेंबर रोजी सर्व जिल्हयातील माजी सैनिक, एन. सी.
सी. नॅशनल खेळाडू करिता पदे भरती होणार
असून दि. 5 डिसेंबर रोजी मेडीकल टेस्ट घेतली जाणार असल्याची माहिती कॅप्टन मोहन
कुलकणी यांनी दिली आहे.
तरी
जळगांव जिल्हयासह औरंगाबाद, बुलढाण, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी , धुळे व
नंदुरबार जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सैन्य भरती मेळाव्यात सहभागी व्हावे
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॅप्टन कुलकर्णी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment