मुंबई, दि.
1 : खासगीकरणाच्या माध्यमातून बांधा,
वापरा व हस्तांतरीत करा या योजनेतून मे. अशोक इन्फ्रास्ट्रक्चर, नाशिक
यांनी धुळे जिल्हयातील सुरत- धुळे रस्त्यावर धुळे शहराबाहेरुन वळण रस्ता
स्वखर्चाने बांधला आहे. मुंबई मोटार वाहन कर अधिनियम 1958 चे कलम 20 अन्वये या
रस्त्याचा वापर करणाऱ्या मोटार वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाऱ्या
अनुयानांवर 24 ऑक्टोबर 2012 पासून पथकर लागू करण्यात आला आहे. हा पथकर 23
एप्रिल 2013 पर्यंत लागू राहणार आहे. बाह्य रस्त्यावर किलोमीटर 4/250 येथील पथकर नाक्यावर हा पथकर
घेण्यात येणार आहे.
वाहनांचा प्रकार व
पथकराचे प्रती फेरीचे दर अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत.
मोटार सायकल, स्कुटर,
मोपेड आणि इतर दुचाकी वाहने यांना पथकर लागू करण्यात आलेला नाही.
मोटार कार, टॅक्सी,
जीप, पीक-अप व्हॅन,
स्टेशन वॅगन, टेम्पो, ऑटोरिक्षा किंवा अन्य तीन चाकी वाहने-
8 रुपये ; बससे- 25 रुपये ; ट्रक्स-30
रुपये मोटार वाहन अधिनियम -1988 (188 चा 59) मध्ये व्याख्या
केल्याप्रमाणे मोटार, सायकल, स्कूटर, इतर दुचाकी वाहने, मोटार कार,
टॅक्सी, जीप, पीक-अप व्हॅन, स्टेशन वॅगन, टेम्पो,
ऑटोरिक्षा किंवा अन्य तीन चाकी वाहने, बसेस,
ट्रक्स वगळून इतर सर्व मोटार वाहनांना -80 रुपये.
पथकराच्या
दरामध्ये देण्यात आलेल्या सवलती
एकाच वाहनास दिवसातून
एकापेक्षा जास्त वेळा हा वळण रस्ता ओलांडावयाचा असल्यास, वाहन
मालक, दिवसातील सर्व फेऱ्यांकरिता हा रस्ता ओलांडण्यासाठी
पहिल्याच फेरीमध्ये वरील पथकराच्या दराच्या दिडपट रक्कम भरु शकेल किंवा या
वळण मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या वाहनांसाठी वाहन मालक मासिक पास
घेऊ शकेल. या मासिक पासाची किंमत वाहनाच्या तीस एकेरी
फेरीकरिता द्याव्या लागणाऱ्या दराएवढी
असेल.
पथकरातून
सूट देण्यात आलेली वाहने.
भारताचे राष्ट्रपती,
उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल व वाहनांना लाल दिवा अनुज्ञेय असलेल्या अतिमहत्वाच्या
लोकप्रतितिधीची वाहने, लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान व माजी सदस्य, तसेच
महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान व माजी सदस्य प्रवास
करीत असलेली वाहने, केंद्र व राज्य शासनाची वाहने, लष्कराच्या मालकीची वाहने,
पोलीस विभागाची वाहने, टपाल व तार खात्याची वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका,
अग्निशमन दलाची वाहने.
पथकराच्या
दरामध्ये देण्यात आलेल्या सवलती
पथकर दराचा फलक पथकर नाक्यावर सर्वांना दिसेल अशा
पध्दतीने लावणे आणि वाहनधारकास प्रत्येक
वेळी पथकर वसुलीची संगणकीकृत पावती देणे आवश्यक आहे. बाह्यवळण रस्त्यावर पथकर वसूल करण्याचा व पथकराची संपूर्ण रक्कम
ठेवून देण्याचा हक्क मे. अशोक इन्फ्रास्ट्रक्चर, नाशिक यांना प्रदान करण्यात आला
आहे.
याबाबतची
अधिसूचना शासनाच्या असाधारण राजपत्र भाग चार-ब मध्ये 23 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment