मिठाईत भेसळ होऊ नये याची दक्षता घ्यावी
: मनोहर नाईक
मुंबई,
दि. 2 : दिवाळीचा सण
जवळ आला आहे. या सणाच्या निमित्ताने परराज्यातून (गुजरात, मध्यप्रदेश व अन्य
शेजारी राज्यामधून) येणारा मावा, खवा, दूध व दुग्धजन्य पदार्थ ज्यापासून मिळाई
तयार होते
त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश
अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी दिले.
अन्न
व औषध प्रशासन विभागाच्या बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती,
औरंगाबाद या विभागातील संबंधित अधिकाऱ्याची बैठक अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर
नाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या
बैठकीस राज्यमंत्री सतेज पाटील, आयुक्त महेश झगडे, सह सचिव श्री. सूर्यवंशी तसेच
विभागाचे सर्व सह आयुक्त व उपायुक्त उपस्थित होते.
दिवाळीत
मिठाईमध्ये भेसळीचा अनुचित प्रकार घडल्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदार
धरण्यात येईल, असे श्री. नाईक यांनी सांगितले. राज्यातील जनतेला दिवाळीमध्ये
पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू भेसळमुक्त व चांगल्या दर्जाच्या
उपलब्ध होतील याची काळजी घेण्यात यावी. तसेच सर्व नागरिकांना दिवाळीचा सण
कोणत्याही अनुचित प्रकार न घडता सुखकारक, आनंदाचा जाईल याची योग्य ती दक्षता
घ्यावी अशा सूचनाही श्री. नाईक यांनी यावेळी दिल्या.
* * * * *
* *
नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत
जात पडताळणीचे अर्ज स्वीकारणार
मुंबई, दि. 2 :
ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या 31 डिसेंबर 2013 पर्यंत होणाऱ्या निवडणुकीसाठी राखीव
जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणीचे अर्ज संबंधित
निवडणूकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सादर करता येतील.
ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकीत
निवडून आलेल्या उमेदवारास 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची
अट घालण्यात आली आहे. या संदर्भात सर्व संबंधित यंत्रणेने उमेदवारांचे जात
पडताळणीचे अर्ज नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वीकारावेत, अशा
सूचना सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिल्या आहेत.
* * * * * * *
सहकारी संस्था स्थापण्यास
मूलभूत अधिकाराचा दर्जा
- हर्षवर्धन पाटील
मुंबई, दि. 2 : सहकारी संस्था स्थापण्यास मूलभूत
अधिकाराचा दर्जा देणारी 97 वी घटना दुरुस्ती करुन केंद्र शासनाने देशाच्या
अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्राला असलेले अनन्य साधारण महत्त्व अधोरेखित केले आहे,
असे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे सांगितले.
97 व्या घटना दुरुस्ती संदर्भात सहकार
मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या मंत्री समितीच्या आज सह्याद्री येथे
आयोजित बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी पदुम मंत्री मधुकरराव चव्हाण, सहकार
राज्यमंत्री प्रकाश सोळंके, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार सचिव राजगोपाल देवरा,सहकार
आयुक्त मधुकर चौधरी तसेच तज्ज्ञ समितीचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित
होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की,
सहकाराच्या वाढीसाठी सहकारी संस्थांना स्वायतत्ता देणे महत्त्वाचे आहे. सभासदांचे
लोकशाही नियंत्रण, संचालकांची मर्यादित संस्था, वेळच्या वेळी निवडणुका,
व्यावसायिकतेसाठी "Functional
Directors" ची नियुक्ती या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश
या घटना सुधारणेमध्ये केला आहे. त्यामध्ये नमूद केल्यानुसार सभासदांचा संस्थेच्या
व्यवसायात थेट सहभाग आवश्यक ठरणार असून क्रियाशील नसलेल्या सभासदांचे संस्थेवरील
अनावश्यक नियंत्रण आपोआप नष्ट होणार आहे. भविष्यात सहकारी संस्थांचे व्यवस्थापन
जास्तीत जास्त व्यावसायिक व सभासदाभिमुख होऊन 'सहकार' हे सामाजिक परिवर्तनाचे साधन ठरणार आहे. मुक्त अर्थव्यवस्थेतील
स्पर्धात्मक वातावरणात सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार भविष्यात अत्यंत महत्त्वाचा
ठरणार असून समव्यावसायिक सहकारी संस्था एकत्र येऊन इतरांशी स्पर्धा करताना पहावयास
मिळतील असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
²ÖÖŸÖ´Öß
ÜÖÖ¡Öß“Öß . . . ´ÖÖׯüŸÖß ¯ÖÏÝÖŸÖß“Öß . . . ¾Öê¬Ö ³Ö×¾ÖµÖÖ“ÖÖ . . .
No comments:
Post a Comment