मुंबई, दि.
19 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत कार्यरत
असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना
प्रत्येकी रुपये एक हजार इतकी रक्कम भाऊबीज सन 2012-13 करिता देण्याचा नुकताच
निर्णय शासनाने घेतला आहे. आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये एक हजार इतकी रक्कम
देण्यात आली होती. या वर्षात ही भेट देण्यास शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने
मंजुरी दिली आहे.
नागरी, ग्रामीण व आदिवासी
प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट
अदा करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक
अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सदर
शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
असून त्याचा संगणक सांकेतांक 201211171304161930 असा आहे.
No comments:
Post a Comment