Tuesday, 6 November 2012

राष्ट्रीय शालेय सॉप्टबॉल क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांनी समन्वय ठेवावा - शशीकांत हिंगोणेकर



            जळगांव. दि. 6 :- जिल्हयात 58 व्या राष्ट्रीय शालेय सॉप्ट बॉल क्रीडा स्पर्धा 2011-12 दिनांक 18 ते 22 नोव्हेंबर 2012 या कालावधीत होणार असून सदरच्या स्पर्धेचे आयोजन उत्कृष्टपणे करुन स्पर्धा यशस्वी व्हाव्यात याकरिता मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांनी समन्वय ठेवण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.
            आज सायंकाळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आयोजित मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांच्या सभेला मार्गदर्शन करत होते. ते यावेळी क्रीडा उपसंचालक ए. पी. आदाणे, प्र. क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, मनपा क्रीडा अधिकारी किरण जावळे, मुख्याध्यापक संघाचे दत्तात्रय देवळे, सॉप्टबॉल संघटनेचे सचिव प्रदीप तळवलकर आदिसह मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
            सदरच्या स्पर्धेकरिता राज्यातील सर्व शालेय सॉप्टबॉल संघ सहभागी होणार असून सुमारे 400 ते 500 खेळाडू स्पर्धेत भाग घेतील. त्यामुळे स्पर्धा यशस्वी होऊन जळगांव जिल्हयाचे नांव राष्ट्रीय पातळीवर जावे याकरिता सर्वांना  परस्परांत समन्वय ठेवून कार्य करणे आवश्यक असल्याचे श्री. हिंगोणेकर यांनी सांगितले.
            सदरच्या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार असून स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा परिषदेकडे आहे. तर क्रीडा परिषदेतील सर्व सदस्यांनी व स्पर्धा आयोजनाच्या विविध समित्यांच्या सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याची सूचना क्रीडा उपसंचालक ए. पी. आदाणे यांनी केली. तसेच मागील वर्षी जळगांव क्रीडा परिषदेने राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.
            सभेचे प्रास्ताविक प्रदीप तळवलकर यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी मानले.                                                   00000

  हयातीचे दाखले बॅकेत सादर करावेत

            जळगांव, दि. 6 :- राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक / कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना सुचीत करण्यात येते की, महाराष्ट्र कोषागार नियम 357 नुसार दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या एक (1) तारखेनंतर हयात (जिंवत असल्याचा) दाखला स्वाक्षरीनिशी, बॅंक खाते क्रमांक नमुद करुन निवृत्ती वेतन घेत असलेल्या बॅकेत सादर करण्याची दक्षता घ्यावी. त्याशिवाय माहे नोव्हेंबर महिन्याचे निवृत्ती वेतन प्रदान केले जाणार नाही. याची नोंद घ्यावी, तरी सर्व निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचे दाखले बॅकेत जमा करावेत असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment