Wednesday, 7 November 2012

बोदवड व पारोळा येथे माजी सैनिक तालुका समिती बैठकीचे आयोजन


बोदवड व पारोळा येथे माजी सैनिक तालुका समिती बैठकीचे आयोजन

             जळगांव दि. 7 :- बोदवड व पारोळा तालुक्यातील सर्व माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता खालील प्रमाणे गठीत केलेल्या समितीची बैठक संबंधित तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी त्यांच्या अडीअडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्या व बैठकीस हजर राहुन आपले प्रकरण  मा. तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी आवाहन केले आहे. बोदवड तालुका समितीची बैठक दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा. तर पारोळा तालुका समितीची बैठक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
* * * * * * *

पुणे येथे 25 नोव्हेंबर रोजी माजी सैनिकांचा मेळावा
           जळगांव, दि. 7 :- पुणे येथे माजी सैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून सदरच्या मेळाव्यात जळगाव जिल्हयातील सर्व आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या माजी सैनिक, युध्दविधवा व अवलंबित यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी यांनी केले आहे. सदरचा मेळावा दि. 25 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी 9 ते दुपारी 9.30 वाजेपर्यंत भगत पॅव्हिलीयन बॉम्बे इंजिनीयर गृप व सेंटर खडकी पुणे येथे होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.                                   
* * * * * *

No comments:

Post a Comment