जळगांव, दि. 26 :- राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प
संस्था जळगांव व पुणे येथील यशदा संस्थेमार्फत बाल कामगार प्रकल्प संस्थेचे
प्रकल्प संचालक आणि सरकारी कामगार अधिका-यांसाठी आयोजित करण्यांत आलेल्या
कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचे हस्ते दिप प्रज्वलन
करुन झाले.
या
कार्यक्रमाप्रसंगी प्रकल्पाचे सदस्य सचिव जी. जे. दाभाडे, सहाय्यक कामगार अधिकारी,
प्रकल्प संचालिका अंजली मोढे, व इतर जिल्हयातील सर्व प्रकल्प संचालक व सरकारी
कामगार अधिकारी उपस्थित होते.
या
कार्यक्रमासाठी प्रकल्पाचे जीवन मोरे, अश्पाकअली सैय्यद, वैशाली कोकाटे, डॉ. लोकेश
चौधरी, महेंद्र एस. भोई, जयश्री पवार व सर्व बाल कामगार शाळेतील शिक्षकवृंद
कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
No comments:
Post a Comment