जळगांव, दि. 20 :- कोल्हापूर येथील शासन अंगीकृत
महासैनिक प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरीटी एजेन्सी रुल्स
2007 प्रमाणे सुरक्षा रक्षकासाठी निवासी प्रशिक्षणाची शिबीरे माफक शुल्कात आयोजित
केली जातात. सुरक्षा रक्षक पदासाठी प्रशिक्षणप्राप्त प्रमाणपत्र असणे कायदयाने बंधनकारक आहे. सुरक्षा रक्षकाची
नोकरी करु इच्छिणा-यांना फक्त 8 वी पास आणि सुदृढ युवकांना आवश्यक असलेले प्रशिक्षण
घेता यावे यासाठी माजी सैनिक महामंडळ (मेस्को) अंतर्गत कसबा बावडा, कोल्हापूर येथे
अनुभवी माजी सैनिक अधिका-याच्या मार्गदर्शनाखाली निवासी सुरक्षा रक्षक प्रशिक्षण
केंद्र चालवले जाते. या केंद्रामध्ये 21 वे शिबीर दि. 15 डिसेंबर ते 07 जानेवारी
2013 रोजी होत असून जळगांव जिल्हयातील इच्छुकांनी महासैनिक ट्रेनिंग सेंटर लाईन
बाजार, कसबा बावडा कोल्हापूर – 416 006 फोन नं- 0231 – 2663162 मो.न. –
9422039718, 902155363, 9420354481 या पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment