जळगांव,
दि. 20 :- शासनाच्या लेखा व कोषागारे कार्यालयाच्या वतीने दिनांक 21 नोव्हेंबर
2012 ते 23 नोव्हेंबर 2012 या कालावधीत घेण्यात येणा-या 53 व्या महाराष्ट्र लेखा
लिपीक परीक्षेचे आयोजन नाशिक शहरातील मुख्याध्यापिका, रमाबाई आंबेडकर कन्या
विदयालय, आदिवासी विकास भवन शेजारी, गडकरी चौक, आग्रा रोड नाशिक 422002 या परिक्षा
केंद्रावर करण्यात आले आहे. अशी माहिती सहसंचालक, लेखा व कोषागारे नाशिक विभाग,
नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
सदरील परिक्षेसाठी परवानगी देण्यात
आलेल्या उमेदवारांची यादी, परिक्षेचे वेळापत्रक व ओळखपत्राचा नमुना जिल्हा कोषागार
कार्यालय नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदुरबार यांचे कार्यालयात उपलब्ध करुन
देण्यात आलेला आहे. परिक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी त्या त्या
जिल्हयातील कोषागार कार्यालयांशी संपर्क साधून त्यांचेकडून परिक्षेचे वेळापत्रक व
ओळखपत्राचा नमुना प्राप्त करुन घ्यावा व
अधिकृत ओळखपत्रासह परिक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन सहसंचालक स.न.औताडे लेखा व
कोषागारे , नाशिक विभाग, यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment