जळगांव, दि. 6 :- रोजगार व स्वयंरोजगार
विभागाच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केद्रांमध्ये नांव नोंदणी, नूतणीकरण,
शैक्षणिक पात्रता वाढ करणे , नोंदणीचे स्थलांतर व संपर्कात बदल या सर्व सेवा मोफत
उपलब्ध आहेत.
रोजगार
व स्वयंरोजगार विभागामार्फत उमेदवार व उदयोजक यांना दिल्या जाणा-या सेवा अधिक
तत्पर, पारदर्शक व एकात्मिक संगणकीय पध्दतीने सहजतेने मोठया प्रमाणात ग्रामीण व
शहरी भागापर्यत उपलब्ध करण्यांत आलेल्या आहेत. या सर्व सेवांचे विकेंद्रीकरण
करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील
सर्व शासकीय आय. टी. आय. तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविदयालये, व महा ई सेवा
केद्रे यांचेमार्फत उमेदवारांना नांव नोंदणी , नूतणीकरण, शैक्षणिक पात्रता वाढ
करणे, नोंदणीचे स्थलांतर व संपर्कात बदल तसेच उदयोजकांना नवीन आस्थापना नोंदणी इ
आर 1 व इ आर 2 विवरणपत्र सादर करणे याबाबतच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
रोजगार
व स्वयंरोजगार विभागाची वेबसाईट http:// maharojgar.gov.in वर सुध्दा उमेदवार
नोदणीबाबतची सर्व कामे करु शकतात.
उमेदवारांची
व उदयोजकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सहायक संचालक, जिल्हा रोजगार व
स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, जळगांव यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषदेचा वार्षिक
अहवाल मंजुर
जळगांव, दि. 6 :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक
प्रशासन अहवाल) नियम 1964 मधील नियम 9 अन्वये, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा
परिषद जळगांव यांनी जळगांव जिल्हा परिषदेचा सन 2011-2012 चा वार्षिक प्रशासन अहवाल
जिल्हा परिषद, ठराव क्र. 65 दिनांक 17 ऑक्टोंबर 2012 नुसार मंजुर केला आहे. असे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment