मुंबई, दि. 30 : नवीन
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन
आयोगाच्या अंमलबजावणीमुळे 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 या कालावधीतील सुधारित
वेतनाच्या थकबाकीची रक्कम जमा करण्याकरिता कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. त्यानुसार
थकबाकीची रक्कम 2009 पासून दरवर्षी जून महिन्यात जमा करावयाची आहे. थकबाकीची रक्कम
प्रत्यक्षात कोणत्याही दिनांकास जमा केली असली तरी थकबाकीच्या रकमेवरील व्याज
प्रत्येक वर्षाच्या 1 जून पासून देय राहील.
नवीन योजनेंतर्गत जमा होणारे कर्मचाऱ्याचे नियमित मासिक अंशदान व त्यावरील
शासनाचे अंशदान अशा एकत्रित रकमेवरील व्याज प्रमाणकाच्या दिनांकापासून अथवा
चलनाद्वारे बँकेत पैसे जमा झाल्याच्या दिनांकापासून अनुज्ञेय राहील.
जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक
शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित
अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे इत्यांदीमधील कर्मचाऱ्यांना उपरोक्त
सूचना योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील..
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharshtra.gov.in या
वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201211161233281505 असा आहे.
No comments:
Post a Comment