जळगांव,
दिनांक 5 :- जिल्हयात हिवताप, मलेरिया व डेंग्यूचे नविन रुग्ण होणार नाहीत व
कोणताही रुग्ण दगावणार नाही याबाबत आरोग्य यंत्रणेने बारकाईने लक्ष ठेऊन
साथरोगांचे नियंत्रण करावे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या साथरोग नियंत्रण व स्वच्छता
मोहिमेबाबत आढावा बैठकीत केले.
बैठकीस महानगर पाहिलकेचे आयुक्त व
प्रभारी जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी शितल उगले,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार, जिल्हयातील सर्व
तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व
आरोग्य यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री
गुलाबराव देवकर म्हणाले की साथरोगांचे नियंत्रण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व
अधिकारी यांचा सहभाग आवश्यक असून जिल्हयातील साथरोग नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना
करण्यात याव्यात त्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन पूर्वक आराखडा तयार करावा व तो
लोकप्रतिनिधींच्या सहभागाने , ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगर
पालिका यांच्या स्तरावर राबविण्यात यावा. दररोज रुग्णांचा आढावा घेण्यात येऊन
साथरोग नियंत्रणात राहतील व नविन रुग्णांना त्याची लागण होणार नाही याबाबत दक्षता
घेण्यात यावी तसेच 20 नोव्हेंबर पासून जिल्हयात स्वच्छता पंधरवडयाचे आयोजन करण्यात
येणार असून त्याचे योग्य ते नियोजनही करावे व या कार्यक्रमास धडक मोहिमेचे स्वरुप
देण्यात यावे असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
पवार यांनी स्वच्छता मोहिम पंधरवडयात करण्यात येणाऱ्या रोजच्या कामांची माहिती
दिली तसेच मनपा आयुक्त सोमनाथ गुंजाळ, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी शितल उगले
यांनीही साथरोग नियंत्रणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी साथरोग
डासांमुळे होतात व पसरतात त्यांच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत
संगणकीय सादरीकरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment