मुंबई, दि. 20 : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांसाठी 65 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. पत्रकार कल्याण निधीच्या नुकत्याच झालेल्या
उपसमितीच्या दुसऱ्या बैठकीत या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
या
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक
प्रमोद नलावडे हे होते. यावेळी सदस्य सचिव संचालक श्रीमती श्रद्धा बेलसरे-खारकर, सदस्य डॉ. परवेज खान, यशवंत पाध्ये, श्रीमती राही भिडे, उपसंचालक
श्रीमती रश्मी नांदिवडेकर उपस्थित होते.
श्रीमती रश्मी नांदिवडेकर उपस्थित होते.
या
बैठकीत राजबहाद्दूर यादव यांना 50
हजार आणि बाळू पंडित यांना
15 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. माहिती संचालक श्रीमती श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या हस्ते पत्रकार श्री. यादव यांना 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, किरण नाईक, प्रकाश सावंत, मंदार पारकर आदी उपस्थित होते.

शंकरराव
चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना दुर्धर आजार झाल्यास,
अपघात झाल्यास किंवा अपघाती/आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या
कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते. या निधीतून आतापर्यंत 7 लाख 43 हजार 200 रुपये इतकी
मदत करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment