जळगांव, दि. 5 :- राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर
अभ्यास दौरे या योजनेत लाभार्थी शेतक-यांना सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण अटी
पुढील प्रमाणे आहेत
सदर
योजनेत सहभागी होणारे लाभार्थी हे स्वत: शेतकरी असावेत व त्याचे नावे 7/12 व 8 अ
चा उतारा असावा, वय, जन्मतारीख प्रमाणपत्र असावे, शेतक-यांनी पासपोर्ट काढलेला
असावा, शेतक-याने स्वत:चा आरोग्य विमा काढलेला असावा, शेतकरी हा शासकिय /
निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा, अर्जदाराचे वय हे 65 वर्षापेक्षा अधिक नसावे, सदर
योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीस दयावयाचा असल्याकारणाने पती-पत्नी
या दोघांचे अर्ज जिजामाता पुरस्काराशिवाय स्विकारला जाणार नाही.
सन 2012-13 मध्ये आयोजित दौ-यांचा व खर्चाचा
तपशिल खालीलप्रमाणे
युरोप – 1 गटात समाविष्ट असलेल्या देशांची नावे
– जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड व ऑस्ट्रीया (10 दिवस), एकूण खर्च (रुपये)
130000/-, शासकीय अनुदान (रुपये)– 65000/-, शेतक-यांचा हिस्सा (रुपये) 65000/-
युरोप
– 2 गटात समाविष्ट असलेल्या देशांची नावे – जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, स्पेन (10
दिवस), एकूण खर्च (रुपये) 155000/-, शासकीय अनुदान (रुपये)– 77500/-, शेतक-यांचा
हिस्सा (रुपये) 77500/-
दक्षिण
आशिया - गटात समाविष्ट असलेल्या देशांची नावे – व्हिएतनाम, मलेशिया व थायलंड (10
दिवस), एकूण खर्च (रुपये) 95000/-, शासकीय अनुदान (रुपये)– 47500/-, शेतक-यांचा
हिस्सा (रुपये) 47500/-
दक्षिण
आफ्रिका, केनिया - गटात समाविष्ट असलेल्या देशांची नावे – दक्षिण आफ्रिका, केनिया
(10 दिवस), एकूण खर्च (रुपये) 155000/-, शासकीय अनुदान (रुपये)– 77500/-,
शेतक-यांचा हिस्सा (रुपये) 77500/-
दक्षिण अमेरिका - गटात समाविष्ट असलेल्या देशांची
नावे – ब्राझील , पेरु, चिली (10 दिवस), एकूण खर्च (रुपये) 289000/-, शासकीय
अनुदान (रुपये)– 100000/-, शेतक-यांचा हिस्सा (रुपये) 189000/-
ऑस्ट्रेलिया,
न्युझीलंड, सिंगापुर - गटात समाविष्ट असलेल्या देशांची नावे – ऑस्ट्रेलिया,
न्युझीलंड, सिंगापुर (10 दिवस), एकूण खर्च (रुपये) 205000/-, शासकीय अनुदान
(रुपये)– 100000/-, शेतक-यांचा हिस्सा (रुपये) 105000/- अधिक माहितीसाठी तालुका
कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाययक यांचेशी संपर्क
साधावा. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment