Tuesday, 20 November 2012

नाशिक येथे आयोजित परिसंवाद पुढे ढकलण्यात आल्याची नोंद घेण्याचे आवाहन


          जळगांव, दि. 20 :- महाराष्ट्र विधानमंडळाचे अमृत महोत्सवी, वर्ष आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व भारताचे भूतपूर्व उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या तसेच कृषी व औदयोगिक क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.  वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथे दिनांक 24 नोव्हेंबर, 2012 रोजी आयोजित करण्यात आलेला प्रदर्शन व परिसंवादाचा कार्यक्रम तूर्त पुढे ढकलण्यात आला आहे, तरी याची दखल जळगांव जिल्हयातील महामंडळांचे अध्यक्ष, सर्व नगरपालिका / नगरपरिषदांचे नगराध्यक्ष उपनगरध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी घ्यावी असे विलास आठवले उप सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment