Monday, 19 November 2012

जळगावला 58 व्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा सुरु पालकमंत्री देवकर यांचे हस्ते उदघाटन

             जळगांव. दि. 19 :- क्रीडा व युवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, आणि जळगावं जिल्हा  सॉफ्टबॉल संघटना यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगांव येथे 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यत आयोजित 58 व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉलÖ क्रीडा स्पर्धाचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर होते.
            14 वर्षीय शालेय मुले - मुलींच्या सॉफ्टबॉलÖ क्रीडा स्पर्धेत देशातील महाराष्ट्र, गुजरात, गोवा, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व विद्याभारती येथील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला असून या स्पर्धा 19 ते 22 नोव्हेंबर पर्यत सुरु राहणार आहेत.
            प्रारंभी सर्व खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक जगन्नाथ आधाने यांनी केले.
            यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना  पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, 58 वी राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा जळगांवमध्ये संपन्न होत आहे. ही जळगांवच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची घटना असून ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कठोर परिश्रम घेतले त्यांना धन्यवाद दिले व सर्व खेळाडूंचे स्वागत केले. क्रीडा स्पर्धा निकोप वातावरणात व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमत्री देवकर पुढे म्हणाले की, सर्व खेळाडूनी खिलाडू वृत्तीने खेळावे व स्पर्धेत विजयी व्हावे असेही देवकर यांनी सांगितले. क्रीडांगण पूजन व क्रीडा स्पर्धाचे उदघाटनही पालकमंत्री देवकर यांनी केले.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सॉफ्टबॉल या खेळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करुन खेळाडूंनी खेळाचे चांगले प्रदर्शन करावे असे सांगितले.
            कार्यक्रमास जळगांवच्या महापौर सौ. जयश्री धांडे, महिला बालकल्याण समिती सभापती लताताई भोईटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गप्फार मलिक, जिल्हा क्रीडा  महासंघाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, विविध राज्यातील विद्यार्थी खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गर्शक, क्रीडा निरीक्षक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment