मुंबई, दि.17 : 1
नोव्हेंबर 2005 पूर्वी शिक्षण सेवक/कृषी सेवक/ग्रामसेवक या पदावर नियुक्त झालेले जे कर्मचारी
मानधनावरील सेवा समाधानकारकरित्या पूर्ण करुन नियमित वेतनश्रेणीत रुजू झाले आहेत,
असे कर्मचारी ती सेवा सोडून दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य
शासनाच्या दुसऱ्या सेवेत विहीत मार्गाने रुजू झाले आहेत, त्यांना महाराष्ट्र नागरी
सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे
अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरेल. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी शिक्षण सेवक /
ग्रामसेवक/ कृषी सेवक या पदावर मानधनावर केलेली सेवा तसेच नियमित वेतनश्रेणीतील
सेवा त्यांच्या निवृत्तीवेतन लाभासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
या निर्णयानुसार
शिक्षण सेवक/ कृषी सेवक / ग्रामसेवक या मानधनाच्या पदावरील 3 वर्षाचा कालावधी
समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर या कर्मचाऱ्यांना नियमित पदावर/ वेतनश्रेणीत नियुक्ती
द्यावयाची असून त्याची मानधनावरील सेवा निवृत्तीवेतन लाभासाठी ग्राह्य धरण्यात
येणार आहे. म्हणजेच मानधनावरील सेवा पूर्ण
होणे ही नियमित वेतनश्रेणी लागू होण्याची अट आहे.
याचाच अर्थ जोपर्यंत मानधनावरील सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कर्मचारी
शिक्षक/कृषी सहाय्यक/ ग्रामसेवक या अनियमित वेतनश्रेणीसाठी देखील पात्र ठरत नाही.
त्यामुळे जे कर्मचारी मानधनावरील सेवा पूर्ण करण्यापूर्वीच ती सेवा सोडून दि.1
नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या दुसऱ्या सेवेत विहीत मार्गाने
नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषेत अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू
राहील.
जिल्हा
परिषदा तसेच ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 महाराष्ट्र
नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह
निधी योजना लागू आहेत, अशा मान्यताप्राप्त व 100 टक्के शासन अनुदानप्राप्त
शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय
महाविद्यालये व कृषी विद्यापीठे इत्यादींच्या सेवेमध्ये दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी
किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या
कर्मचाऱ्यांसाठी योग्य त्या फेरफारांसह हे परिपत्रक लागू ठरेल.
याबाबतचे
परिपत्रक वित्त विभागाने 28 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिध्द केले आहे. ते परिपत्रक
शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक
201210011134180700 असा आहे.
No comments:
Post a Comment