चाळीसगांव दि. 11:- तालुक्यातील तमगव्हाण येथे जप्त करण्यात आलेली 39 ब्रास
वाळुची विल्हेवाट लावण्यासाठी जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला असून सदर वाळुची प्रतिब्रास
रु. 1800/- इतकी सरकारी किम्मत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आली आहे
व सदर वाळुचा लिलाव करण्यासाठी तहसिल कार्यालयास प्राधिकृत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने
सदर वाळुचा लिलाव व निवीदा पध्द्तीने विल्हेवाट लावण्यासाठी जाहिर लिलाव गुरुवार दिनांक
18.10.2012 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालय, चाळीसगांव, जि. जळगांव येथे आयोजित
केला आहे.
सदर जाहिर लिलावाच्या अटी व शर्ती इ.संबंधीचा संपुर्ण तपशिल तहसिलदार चाळीसगांव यांच्या
कार्यालयास कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल. सदर जाहिर लिलावात निवीदा भरणारे अथवा
न भरणारे सर्व व्यक्ती जाहीर लिलावात भाग घेऊ शकतील. निवीदा स्विकृतीची अंतीम तारीख
व जाहिर लिलावाचा दिनांक 18.10.2012 असा असून त्याच दिवशी लिलाव पध्द्तीने व निविदा
यापैकी सर्वाधिक रक्कम असेल त्यास मंजूरी देण्यात येईल.
वाळुचा जाहिर लिलाव, निवीदा स्विकारणे, नाकारणे अगर कोणतेही
कारण न देता लिलाव रद्द करण्याचा हक्क निम्न स्वाक्षरीतांनी स्वत:कडे राखून ठेवले असून
सदर लिलावात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन तहसिलदार हदगल यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment