मुंबई, दि. 18 : केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग
मंत्रालयातर्फे रस्ता सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल तसेच रस्ता
सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या
सातव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पारितोषिकांसाठी 31 ऑक्टोबर 2012 पर्यंत अर्ज
पाठवावेत, असे परिवहन
आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, ट्रॉमा केअर किंवा रस्ता
सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सहभागी असलेल्या आणि संस्था नोंदणी कायदा 1860
अन्वये नोंदणी केलेल्या व स्वेच्छेने काम करणाऱ्या नामांकित संस्था किंवा
व्यक्ती या पारितोषिकांसाठी अर्ज करु शकतात. इच्छुकांनी विहित नमुन्यातील
अर्ज योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधित राज्य परिवहन कार्यालये किंवा राज्य व
केंद्र शासित प्रदेशांच्या परिवहन सचिवांच्या कार्यालयात पाठवावे.
नामांकित सेवाभावी संस्था, त्यांच्याशी संबंधित किंवा त्यांच्याबरोबर किंवा रस्ता सुरक्षेसारख्या
क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांची नावे सुचवू शकतील. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना
संबंधित राज्य परिवहन आयुक्त, परिवहन सचिव तसेच रस्ते परिवहन आणि
महामार्ग मंत्रालयाच्या morth.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment