जळगांव,
दि. 12 :- जिल्हयातील सर्व घाऊक / किरकोळ / हॉस्पिटल अटॅच औषध विक्रेते व सौदर्य
प्रसादने विक्रेत्यांनी घोषित केलेल्या 16 ऑक्टोंबर 2012 च्या औषध विक्री बंदच्या
अनुषंगाने सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येते की, अन्न व औषध प्रशासनामार्फत
राबविल्या जाणा-या औषधे व सौदर्य प्रसादने कायदयाच्या तरतुदी कोणत्याही औषध
विक्रेत्या विरुध्द नाहीत.
औषधे व सौदर्य प्रसादने कायदयांतर्गत
औषधांची विक्री रजिस्टर्ड फॉर्मसीस्टच्या उपस्थितीत व देखरेखीखली होणे बंधनकारक
आहे. प्रशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, काही ठिकाणी रजिस्टर्ड
फॉर्मसीस्ट नसतांना देखील औषध विक्री होत
होती. तसेच काही ठिकाणी प्रशासनास खोटी
माहिती देऊन औषध कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी
रजिस्टर्ड फॉर्मसीस्ट असल्याचे निदर्शनास आले परंतु ते औषधी दुकानात नसतांना देखील औषधी
िवक्री होत असल्याचेही निदर्शसनासआले आहे. त्यामुळे जे रजिस्टर्र्ड
फार्मासिस्ट व मालक दुकानात राहून
नियमांचे पालन करतात त्यांच्यावर अन्याय होतो. आणि खोटी कागदपत्रे सादर करुन
मिळविलेली परवानेधारक मात्र बिनबोभाट नियम
धाब्यावर बसवून व्यवसाय करीत आहेत ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यावर प्रशासनाने
अशा औषध विक्रेत्यावर परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली ज्या
ठिकाणी मालक रजिस्टर्ड फॉर्मसीस्ट व पूर्ण
वेळ राहणारे रजिस्टर्ड फॉर्मसीस्ट आहेत
त्यांना या कायद्याची भीती बाळगण्याचे कारण नाही.
जिल्हा केमिस्ट संघटनेस ,खात्री
देण्यात येते की, औषधे व सौदर्य प्रसादने
कायद्याचे तरतुदीचे पालन होत असलेल्या दुकानांविरुध्द कोणतीही कारवाई करण्यात
येणार नाही तथापी केमिस्ट संघटनेने खोटे कागदपत्रे सादर करुन परवाने मिळविलेल्या
दुकानदारांना सहकार्य करु नये किंवा पाठीशी घालू नये जेणे करुन अधिकृत मार्गानी रजिस्टर्ड
फॉर्मसीस्ट , दुकानदारांवर अन्याय होणार नाही. तरी विना परवाना दुकानदारांच्या
विरुध्द प्रशासनाच्या उघडलेल्या मोहीमेस सहकार्य करुन पूर्णवेळ रजिस्टर्ड फॉर्मसीस्ट म्हणून राहणा-या दुकानदास व प्रशासनास सहकार्य
करावे व दिनांक 16 ऑक्टोंबर 2012 चा नियोजित संप मागे घेऊन जनतेस सेवा दयावी असे
आवाहन गु. बा. निनावे सहाय्यक संचालक अन्न
व औषध प्रशासन जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment