जळगांव, दि. 19 :- शासनाच्या विविध लोककल्याणकारी
योजनांची माहिती जिल्हयाच्या ग्रामीण भागातील नागरिकांपर्यत पोहोचविण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले ते
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पथनाटय रथाच्या उदघाटन प्रसंगी बोलत
होते.
यावेळी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल उगले, समाजकल्याण आयुक्त
व्ही. ए. पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. संतोष थिटे, दिशा बहुउद्देशीय
पथनाटय संस्थेचे विनोद ढगे व इतर कलाकार
उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी राजूरकर यांच्या हस्ते पथनाटय रथाचे उदघाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी राजूरकर यांनी जिल्हयाच्या ग्रामीण भागातील नागरिकापर्यत शासकीय
योजनांची प्रसिध्दी करावी जेणे करुन लोकांना त्या योजनांचा लाभ घेता येईल. या
करिता पथनाटयचा वापर प्रभाविपणे करावा असे सांगितले.
विशेष
जिल्हा समाजकल्याण विभागाकडून विशेष घटक योजनेतंर्गत जिल्हा माहिती कार्यालयास सन
2012-2013 मध्ये विविध शासकीय योजनांच्या
प्रसिध्दीकरिता पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. त्या निधीतून
जिल्हा माहिती कार्यालय दिशा बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हास्तरावर 50
गावांमध्ये पथनाटय कार्यक्रम सादर करणार
आहे.
त्या
कार्यक्रमातून समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रसिध्दी जिल्हास्तरावर करुन
सदरच्या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याकरिता प्रोत्साहन दिले जाणार
आहे. अशा कार्यक्रमाचे औपचरिक उदघाटन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या
हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल उगले यांच्या प्रमुख उपस्थित
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार पडले. सदरच्या पथनाटय रथाला व जिल्हा
माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment