जळगांव, दि. 5 :- महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास विभागामार्फत सन – 2012-13 या वर्षासाठी महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या समाज सेविका व स्वयंसेवी संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार आहेत. जळगाव जिल्हयातील महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या समाजसेविकांना राज्य स्तरीय / जिल्हास्तरीय आणि महिला व बाल कल्याण क्षेत्रात कमीत कमी 5 वर्ष उत्कृष्ठ कार्य असणा-या स्वयंसेवी संस्थांना विभागीय स्तरीय पुरस्कार देण्यासाठी योग्य महिलांचे व संस्थांचे प्रस्ताव मागविणेत येत आहे. पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात दिनांक 15 ऑक्टोंबर 2012 पर्यंत सादर करावेत. अधिक माहिती नमुना अर्जाकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगांव दुरध्वनी क्र. 0257 – 2228828 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment