चाळीसगांव दि. 11:- जिल्हापातळीवर राबविण्यात येणा-या लोकशाही दिनाच्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेचे गा-हाणे ऐकून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्याच्या तिस-या सोमवारी तहसिल कार्यालयात लोकशाही दिन राबविण्यात येणार असल्याचे तहसिलदार शशिकांत हदगल यांनी एका प्र् सिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
त्याच बरोबर तालुक्यातील सर्व अधिका-यांनाही लोकशाही दिनी तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना त्यांनी दिलेल्या आहेत. सर्व विभागांचे अधिका-यांसमोर उपस्थित होणा-या तक्रारींचे निराकरण त्याचवेळी करुन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न तहसिलदार हदगल करणार आहेत.
*****
No comments:
Post a Comment