Monday, 8 October 2012

जिल्हयातील केळी व डाळिंब पिकांचा हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत समावेश


जळगांव, दि. 8 :- हवामान आधारित पथदर्शक फळ पिक विमा योजना सन 2012-13 मध्ये जळगांव जिल्हयातील केळी व डाळींब या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तरी जळगांव जिल्हयातील केळी व डाळींब पिकविणा-या शेतक-यांनी सदरच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के. एस. मुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
केळी डाळींब (हस्तबहार) व विमा संरक्षण
        जिल्हयातील केळी व डाळींब पिकांचा हवामान आधारित केळी पिक विमा योजनेत समावेश झाला आहे. सदरच्या योजनेकरिता मुंबई येथील ॲग्रीकल्चर इंशोरन्स कंपनी ऑफ इंडियाला प्राधिकृत केलेले आहे. या योजनेंतर्गत पिकांकरिता विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी एक लाख रुपये असून त्याकरिता विमा हप्ता प्रति हेक्टरी 12 हजार रु. आहे. त्यात केंद्र शासन व राज्य शासन प्रत्येकी 3 हजार रुपये तर , संबंधीत शेतकरी 6 हजार रु. विम्याची रक्कम सदरच्या कंपनीला अदा करणार आहे.
विमा हप्ता 31 ऑक्टोंबर पूर्वी भरावा
        जिल्हयातील सर्व केळी व डाळींब उत्पादक शेतक-यांनी विमा हप्ता 31 ऑक्टोंबर 2012 पूर्वी भरणे आवश्यक आहे. सदरचा विमा हप्ता नजीकच्या राष्ट्रीयीकृत बॅकेत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत 7/12 उतारा व 8 अ उता-यासह रुपये 6 हजाराच्या हप्ता भरावा.
विमा संरक्षण कालावधी
या योजनेत केळी पिकाला कमी तापमानात ( सलग तीन दिवस 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान) दि. 1 नोव्हेंबर 2012 ते 28 नोव्हेंबर 2013 या कालावधीत विमा संरक्षण असून त्यात भरपाई रक्कम रुपये 25 हजार रुपये आहे. तर वेगाच्या वा-यापासून केळी पिकाला 1 मार्च 2013 ते 30 जुलै 2013 पर्यंत विमा संरक्षण असून या कालावधीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून 75 हजार रुपये दिले जातील. तसेच वेगाचा वारा हा मार्च , एप्रिल व जुलै महिन्यात 40 किमी प्रतितास तर मे जून महिन्यात 45 किमी प्रतितास असा असल्यास सदरची योजना लागू असेल
            तसेच डाळींब पिकाचे अवेळी पावसाने नुकसान झाल्यास सदरची पिक विमा योजनेतून प्रति हेक्टरी 1 लाख रु. ची भरपाई दिली जाणार आहे. याकरिता दि. 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीतसाठी विमा संरक्षण लागू राहील. अवेळी पावसाचे तीन टप्पे करण्यात आले असून 11 ते 20.99 मिनि प्रतिदिना 21 ते 30.99 मि.मि. प्रतिदिन व 31 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस प्रतिदिन असे आहेत. सर्व टप्पे मिळून कमाल नुकसान भरपाई रक्कम 1 लाख रुपये आहे.
तापमान व वारा वेगाची नोंद
        सदरच्या योजनेत तापमानाची नोंद वा-याचा वेग महसूल मंडळावर स्थापन करण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई विमा कालावधी संपल्यापासून 45 दिवसांत परस्पर शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
पिक विमा योजनेत कार्यरत महसूल मंडळे
            सदरच्या पिक विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजाणी व्हावी याकरिता प्रत्येक तालुक्यासाठी महसुल मंडळे कार्यरत आहेत. यात केळी पिकासाठी पिंप्राळा, भोकर, म्हसावद (ता.जळगांव,) , वरणगांव, पिंपळगांव बु. (ता. भुसावळ ), मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगांव, कु-हा , (ता. मुक्ताईनगर ), रावेर, खानापूर, ऐनपूर, खिर्डी, बु. निंभोरा बु, खिरोदा प्र. या. सावदा ‘(ता रावेर), यावल किनगांव, साकळी, बामणोद, भालोद, फैजपूर (ता. यावल), नाडगांव (ता. बोदवड), अंमळनेर, नगांव, पातोंडा, अमळगांव, मारवड (ता. अमळनेर), चोपडा, चहार्डी, हातेड, अडावद, धानोरा प्र. अ. लासूर (ता. चोपडा), धरणगांव, सावळदा, पिंप्री, रोटवद, चांदसर, पाळधी (ता. धरणगांव), एरंडोल, रिंगणवगांव, उत्राण, ग़ह कासोदा (ता. एरंडोल), भडगांव, कजगांव, कोळगांव, आमडदे (ता. भडगांव), जामनेर, नेरी, मालदाभाडी, पहूर, शेंदुर्णी, तोंडापूर, फत्तेपूर, वाकडी (ता. जामनेर), चाळीसगांव, शिरसगांव, बहाळ, मेहूणबारे हातले, तळेगांव, खुडकी बु. (ता.चाळीसगांव), , नांद्रा, कु-हाड बु., नगरदेवाळा, गाळण, वरखेडी पिंपळगांव बु . (ता. पाचोरा) येथे महसूल  मंडळे कार्यरत आहेत. त्याप्रमाणेच डाळींब पिकांसाठी नगरदेवळा, गाळण  (ता. पाचारो), चाळीसगांव, शिरसगांव, मेहुणबारे, हातले, तळेगांव, खकडी बु. (ता. चाळीसगांव) येथे कृषि महसूल मंडळे कार्यरत आहेत.
            तरी जळगांव जिल्हयातील जास्तीत जास्त केळी व डाळींब उत्पादक शेतक-यांनी हवामानावर आधारित पथदर्शक फळ पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
* * * * * *

No comments:

Post a Comment