जळगांव, दि. 31 – येथील जिल्हा उदयोग केंद्र
कार्यालयाकडे कायमस्वरुपी नोंदणी झालेल्या सर्व सूक्ष्म व लघु उदयोग
उपक्रमधारकांनी जिल्हा लघु उदयोग पुरस्कार – 2012 साठी आठ दिवसांच्या आत अर्ज
करण्याचे आवाहन प्रभारी महाव्यावस्थापक
ज्ञा.न.बागडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
सदरचा पुरस्कार राज्य शासनाकडून उदयोग
क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या जिल्हयातील दोन लघु उदयोग घटकांना देण्यात
येतो. प्रथम पुरस्कार 25 हजाराचा तर व्दितीय पुरकार दहा हजाराचा आहे.
सन 2012 चे जिल्हा पुरस्कारासाठी सुक्ष्म व लघु
उद्योग उपक्रम 1 जानेवारी 2009 पूर्वी स्थायी सुक्ष्म किंवा लघु उद्योग उपक्रम
म्हणून जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी झालेला असावा. तसेच उद्योग घटक मागील सलग
दोन वर्ष उत्पादनात असावा. यापुर्वी या योजनेअंतर्गत जिल्हा पुरस्कार प्राप्त
झालेला नसावा.
या पुरस्कारासाठी सर्वसधारणपणे 1) उद्योजकाची
स्थिरमत्ता, उत्पादन व कामगार यांचेमधील वाढ 2)तंत्रज्ञान कौशल्य 3) उद्योजकाची
पार्श्वभूमी 4) उद्योगासांठी निवडलेली जागा 5) उत्पादनात केलेला विकास व गुणवत्ता
6) आयात – निर्यात 7) नवीन उत्पादनासाठी केलेली धडपड 8) घटकाचे व्यवस्थापन व
अकौंटींग सिस्टीम 9) मशिनरीची सर्वसाधारण स्थिती, इमारत व मशिनरीची देखभाल 10)
कामगार कल्याण योजना 11) याव्यतिरिकत अनु.जाती/ जमातीचे उद्योजक असल्यास प्राधान्य
12) कर्ज घेतले असल्यास नियमीत परफेड अशा प्रकारचे निकष लावले जातात.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त सुक्ष्म व लघु उद्योग
उपक्रम धारकांनी सन 2012 चे जिल्हा पुरस्कार योजना अंतर्गत बातमी प्रसिध्द
झाल्याच्या दिनांकापासून आठ दिवसात आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत नमुन्यात अर्ज
करावेत जिल्हा पुरस्कार योजना अंतर्गत अर्ज जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात
विनामुल्य उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment