Thursday, 4 October 2012

जिल्हयात 37 (1) (3) कलम लागू



          जळगांव, दि.4:- जळगांव जिल्हयात सध्या विदयुत पुरवठा खंडीत होणे, वीजभारनियमन, पाणी टंचाई, चारा टंचाई व पतपेढी ठेवीदार संघटनेतर्फे जिल्हयात धरणे, आदोलने, रास्ता रोको, मोर्चे असे कार्यक्रम सुरु असुन वीज वितरणाच्या कार्यालयाचे ठिकठिकाणी मोर्चेक-यांनी तोडफोड करुन नुकसान केल्याच्या घटना यापुर्वी घडलेल्या आहेत. तसेच विविध पक्ष संघटनांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होवुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस न पडल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झालेली असुन सदरवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधिक्षक, जळगांव जिल्हा हद्दीत काही कृत्यांवर बंदी घालणे आवश्यक झाल्यामुळे जिल्हादंडाधिकारी, जळगांव यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) मधील अधिकाराचा वापर करुन या आदेशान्वये दि. 11 ऑक्टोंबर 2012 पर्यंत पुढील प्रमाणे बंदी घातली आहे. शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरीक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. तयार करणे जमा करणे आणि बरोबर नेणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-याचे चित्राचे प्रतिमाचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिक रित्या ओरडणे, रडणे किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितिमत्ता विरुध्द असतील अशी किवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे चित्रे फलक लावणे किंवा इतर कोणत्याही जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालण्यात आली आहे मात्र वरील 37 (1) हा आदेश ज्यांच्या हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु नाही.
            मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यांस पोलीस अधिक्षक, जळगांव यांचे पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यांस बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेत यात्रा यांना लागु नाही. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश 11 ऑक्टोंबर 2012 चे 24.00 वाजेपावेतो अंमलात राहील. असे जिल्हादंडाधिकारी जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment