जळगांव, दि. 6 :- जिल्हयाच्या काही भागात स्वाईन फ्लू व डेंग्यू रोगाचा प्रसार झालेला असून त्यावर त्वरित प्रतिबंध निर्माण
व्हावा या करिता जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका आरोग्य विभाग , जिल्हा परिषद आरोग्य
विभाग व खाजगी रुग्णालयांनी परस्परांत समन्वय ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वाईन फ्लू बाबतच्या
तातडीच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एस.
जयकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, अप्पर
जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त सोमनाथ गुंजाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
लाळीकर, मनपा उपायुक्त भालचंद्र बेहरे, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार,
डॉ. विलास पाटील आयएमऐचे अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, व सचिव अनिल पाटील आदि
उपस्थित होते.
जिल्हयात काल दि. 5 ऑक्टोंबर स्वाईन फ्लूने
दोन रुग्णांचा मुत्यु झाल्याने त्या रोगांचा प्रसार इतरत्र होऊ नये व
जिल्हावासियांना त्याविषयीचे प्रबोधन करुन त्यावर नियंत्रण आणण्याकरिता
जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खाली तातडीची बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी राजूरकर यांनी सदरच्या रोगाच्या
प्रतिबंधाकरिता आरोग्य यंत्रणेतील समन्वयासाठी जिल्हा शल्य चिकित्सकाने नोडल ऑफिसर
म्हणून तत्परतेने काम करण्याची सूचना दिली. तसेच जळगांव शहरात व जिल्हयात सर्वत्र
सार्वजनिक ठिकाणी स्वाईन फ्लू डेंग्यूबाबत प्रबोधनात्मक होर्डीग्ज बॅनर्स
लावण्याची सूचना त्यांनी केली. त्याकरिता शहरात महानगरपालिकेने रेल्वे स्टेशन, बस
स्टँड, आकाशवाणी चौक येथे जागा दयावी असे ही त्यांनी सांगितले.
सामान्य रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूच्या
पेशेंटकरिता स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली असून त्यावर नियंत्रणाकरिता एक पथक
ठेवण्यात आलेले आहे. तसेच स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधाकरिता रुग्णालयाकडे टॅमीफ्लू
गोळयांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लाळीकर
यांनी दिली.
स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण आढळल्यास
त्यास घरी जाऊ न देता वैदयकीय नियंत्राणाखाली रुग्णालयातच ठेवून घेण्याची सूचना
सीईओ शितल उगले यांनी केली. तसेच अशा रुग्णाकरिता स्वतंत्र वार्ड निर्माण करावा.
असेही सांगितले. दि. 5 ऑक्टोंबर रोजी स्वाईन फ्लूने मृत्यु झालेले श्री जोशी व
चौधरी हे दोन्ही रुग्ण प्रवासी होते. व ते बाहेरुन जिल्हयात आलेले होते, अशी
माहिती डॉ. लाळीकर यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्य चिकित्सक
यांनी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्कचा वापर करावा, हसत आंदोलन करु
नये. बोलताना तोंडावर रुमाल ठेवावा, कफ असलेल्यांनी मास्क वापरावे आदि सूचना
केल्या त्याकरिता होर्डींग्ज, बॅनर्स, पॉम्पलेट, रेडिओ, केबल टीव्ही आदिवरुन
नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
आयएमऐचे सदस्य असलेल्या सर्व खाजगी रुग्णालयांनी
त्यांच्याकडे स्वाईन फ्लू व डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास त्वरित माहिती दयावी अशी
सूचना आय एम ऐ कडे करण्यात आली. तसेच टॅमी फ्लू च्या गोळया उपलब्ध असल्याने त्या
खाजगी रुग्णालयाला देता येतील असे डॉ. लाळीकर यांनी सांगितले. आयएमऐ ने एक नोडल
ऑफिसरची नियुक्ती नेमणूक करुन स्वाईल फ्लू पेशेंटची माहिती प्रशासनाला दयावी व
जिल्हा शल्य चिकित्सकाने आयएमऐच्या सर्व आय सी यु सेंटरला भेट देण्याची सूचना
जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली. तसेच शल्य चिकित्सकांनी नोडल ऑफिसर म्हणून
शासकीय आरोग्य यंत्रणेतील समन्वयाबरोबरच खाजगी रुग्णलायांशी समन्वय ठेवून सदरच्या
साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्याची सूचना त्यांनी केली.
पुणे
येथे सॅपल पाठविण्याची सुविधा :-
सामान्य रुग्णालयाच्या वतीने जळगांव
येथून दररोज सायंकाळी 6 वाजता संशयित रुग्णांचे सॅपल पुणे येथील प्रयोगशाळेत
पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदरच्या सुविधेचा लाभ खाजगी
रुग्णालयातील पेशेंटना ही देण्यात येईल, अशी माहिती डॉ. लाळीकर यांनी दिली.
सोमवारी बैठक :-
स्वाईन
फ्लूबाबत आमच्या तातडीच्या बैठकीत केलेल्या सूचना व त्यावरील कार्यवाही बाबतचा
आढावा घेण्यासाठी सोमवार दि. 8 ऑक्टोंबर 2012 रोजी सायंकाळी 6 वा.
जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात बैठकीत घेतली जाणार आहे.
स्वाईन
फ्लू बाबत आरोग्य यंत्रणेचे आवाहन :-
इन्फलूएन्झा ए (एच – 1, एन -1 ) या डुकरांपासून
उदभवलेल्या स्वाईन फ्लू विषाणूचा प्रार्दुभाव माणसास होऊन साथ रोगाचा प्रसार होतो
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जळगांव जिल्हयातील
नागरिकांसाठी सदरच्या साथीपासून बचावाकरिता पुढील उपाय योजना सुचविल्या आहेत –
आजार :- सदरचा आजार हा एच1- एन1 या
विषाणुमुळे होतो. त्याचा संसर्ग एका माणसापासून दुस-या माणसाला होतो.
लक्षणे
:- ताप येणे, खोकला येणे, घसा
दुखणे, उलटया होणे , श्वास घेण्यास त्रास होणे आदि
नागरिकांनी हे करावे :- हात पाणी व साबणाने स्वच्छ धुणे, गर्दीला
जाणे टाळणे, स्वाईन फ्लू रुग्णांजवळ जाऊ नका, तीन स्तरावर मास्क वापरा खोकताना / शिंकताना तोंडाला रुमाला लावा, भरपूर
पाणी व पुरेशी झोप घ्या. तसेच पुरेसा आहार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी
हे टाळावे :-
हस्तांदोलन
अथवा अलिंगन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे
घेऊ नयेत.
No comments:
Post a Comment