जळगांव. जि. 22 :- जिल्हयात महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता सन 2012-2013मध्ये तीनशे गांवे तंटामुक्त करण्याचे उदिष्टय ठेवण्यात येत असून सदरचे उदिष्टय पूर्ण करण्यासाठी सर्व अधिका-यांनी जाणीपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सकाळी आयोजित महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम अंतर्गत जिल्हा कार्यकारी समितीच्या बैठकीत अधिका-यांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलिस अधिक्षक एस. जयकुमार, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, अप्पर पोलीस अधिक्षक रुपसिंग तडवी, प्रांताधिकारी सर्वश्री. रविंद्र राजपूत, राहुल मुंडके, गणेश मिसाळ,तुकाराम हुलवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, विवेक पानसारे, पोलिस निरीक्षक मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजन पाटील, उत्पादन शुल्क अधिक्षक श्री. पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूरकर पुढे म्हणाले की, जिल्हयातील जास्तीत जास्त गांवे तंटामुक्त होण्यासाठी गावांमध्ये जागृती घडवून आणावी. त्याकरिता तालुकास्तरावर 10 नोव्हेंबर पर्यत मेळावे आयोजित करावेत. तसेच प्रत्येक महिन्याला गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी तंटामुक्त गांव समितीच्या कामाचा आढावा घेण्याची सूचना त्यांनी केली.
तसेच जिल्हयातून मोहिमेंतर्गत जी गावे निवडलेली असतात त्या गवाचे सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावे. जेणे करुन बाहेरील जिल्हयाची समिती तपासणीसाठी आली असता केलेल्या कामाचे व रेकॉर्डचे सादरीकरण चांगले असावे. ज्यामुळे गांव तंटामुक्त होण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी राजूकर यांनी सोगितले.कारण जिल्हयात सदरच्या मोहिमेचे काम चांगले केले जात असून रेकॉर्ड च्या अभावी गांवे तंटामुक्त होण्याचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून सदरच्या मोहिमेत गांव तंटामुक्त समित्यांना प्रत्येकी एक ते दोन हजाराच्या निधी कार्यालयीन खर्चासाठी मिळणार आहे. सदरचा निधी, रेकॉर्ड मेनटेन करणे व पुरस्काराचा निधी कसा खर्च करावा याकरिता तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती पोलिस अधिक्षक एस. जयकुमार यांनी दिली. जिल्हयात सदच्या मोहिमेतून अधिकाधिक गांवे तंटामुक्त होण्याची क्षमता आहे. परंतू रेकॉर्ड अभावी व पाठपुरावा न केल्याने गांवे तंटामुक्त होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त गांवे तंटामुक्त व्हावी म्हणून रेकॉर्ड व्यवस्थतीत ठेवणे, तंटामुक्तीसाठी पाठ पुरावा करणे याकरिता कार्यशाळेत भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हयातील 15 तालुके, 29 पोलिस स्टेशन, 1151 ग्रामपंचायती पैकी 1139 ग्रामपंचायती व 1238 ग्रामरक्षक दले मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी यांनी दिली. तर मोहिमेत कंडारी (भुसावळ), बांभोरी प्र. चा. (धरणगांव), तामसवाडी (रावेर), खिरोदा प्र. मस्कावद बु, मस्कावद खु. मांगा, थोरगव्हाण, उदळी बु., सावखेडा खु., सावखेडा बु, ( सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत) आदि 12 ग्रामपंचायतीनी महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेत सहभाग नोंदविला नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पोलिस विभागाकडून जिल्हयातील 349 गांवे दत्तक घेण्यात आली असून सदरची गांवे तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले.
मोहिमेच्या अंमलबजावणीपासून मागील पाच वर्षात जवळपास अडीचशे गांवे तंटामुक्त झाली असून सन 2012-2013 मध्ये 300 गांवे तंटामुक्त करण्याचे उदिष्टय कार्यकारी समितीच्या बैठकीत एकमताने ठेवण्यात येऊन त्या करिता गावांमध्ये जनजागृत करुन रेकॉर्ड मोहिमेचे व्यवस्थीत ठेवले जाणार आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment