जळगांव, दि. 18 :- सुकी, अभोरा, मध्यम
प्रकल्पाच्या कालव्यावर, वितरिकेवर प्रवाही, जलाशय, नदी नाले व कालव्यावर उपसा
सिंचनाने पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांकरिता सन 2012-2013 मध्ये रब्बी
हंगामात सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठयानुसार दिनांक 15 ऑक्टोंबर 2012 ते 28
फेब्रुवारी 2013 या कालावधीत रब्बी हंगामातील गहु, दादर, हरबरा, ज्वारी, अन्यधान्य
भुसार पिके चा-याची पिके, कपाशी, भाजीपाला या पिकांसाठी सिंचनास पाणी पुरवठा
करण्याचे नियोजन असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, जळगांव पाटबंधारे विभाग,
जळगांव यांनी कळविले आहे.
तरी
आपले पाणी अर्ज नमुना क्र. 7 वर मागणी भरुन पाणी अर्ज दिनांक 30 नोव्हेंबर 2012
पर्यत आपल्या भागातील शाखाधिकारी यांचे शाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत,
पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment