Wednesday, 17 October 2012

हतनूर कालव्यातील पाण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यत अर्ज करावेत



        जळगांव. दि. 17 :- हतनुर कालव्यावर उपलब्ध पाणी साठयानुसार व पाणी टंचाई असल्याने सिंचनासाठी फक्त दोन रोटेशन देण्याचे नियोजन असून त्याकरिता संबंधीत लाभधारक शेतक-यांनी   30 नोव्हेंबर 2012 पर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगांव पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.
          सन 2012-2013 मध्ये रब्बी हंगामात दिनांक 15 ऑक्टोंबर 2012 ते 28 फेब्रुवारी 2013 या कालावधीत हतनूर जलाशय, हतनूर कालव्यामध्ये सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठयानुसार रब्बी हंगामातील उभी पिके, दादर, हरभरा, ज्वारी, अन्नधान्य दुबार पिके, कपाशी या पिकांकरिता पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
            तरी सदरच्या पाण्याचा लाभ घेणा-या शेतक-यांनी 30 नोव्हेंबर 2012 पर्यत शाखाधिकारी यांचे कार्यालयात पाणी अर्ज  पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment