Friday, 19 October 2012

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुर्व तपासणी शिबीराचे रांजणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात 21 रोजी आयोजन


चाळीसगांव दि. 19:- तालुक्यातील रांजगांव रुग्ण कल्याण समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुर्व तपासणी शिबीराचे रविवार, दि. 21 ऑक्टोंबर,2012 रोजी सकाळी 10.00 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, रांजणगांव ता. चाळीसगांव येथे आयोजन करण्यांत आले आहे.
या शिबीरात कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांचे सुयोग्य नेत्र विषयतज्ञांद्वारे तपासणी केली जाईल. डोळेसंबंधीत रोगांवर योग्य तपासणी केली जाईल. मोतीबिंदूच्या योग्य रुग्णांना तपासणीनंतर इच्छा असल्यास लगेच शस्त्रक्रियेसाठी वाहनाद्वारे नंदुरबार येथे रुग्णालयात नेले जाईल व ऑपरेशन झाल्यावर विनामुल्य शिबीराच्या ठिकाणी सोडण्यात येईल. तसेच शस्त्रक्रिया  केलेल्या रुग्णाची मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून गरीब व गरजू रुग्णांची विनामुल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया (कृत्रिम भिंग रोपण/लेन्स) करण्यांत येईल. मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णास नजरेचा चष्मा स्वखर्चाने खरेदी करावा लागेल.
त्याचप्रमाणे ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाने औषधोपचार वेळेवर घेणे आवश्यक असून डोळयाला पाणी लागून जंतुससंर्गाने डोळयांचे नुकसान होऊ नये यासाठी रुग्णाने स्वत: विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
या शिबीराचा लाभ घेण्यासाठी ज्यांच्याजवळ सन 2012 चे स्मार्ट कार्ड असतील त्यांना अमेरिकेन लेन्स टाकण्यात येतील. परंतु त्यासाठी स्मार्ट कार्डची झेरॉक्स सोबत असणे आवश्यक आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रांजणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद ओस्तवाल यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment