Saturday, 6 October 2012

जिल्हाधिका-यांच्या हस्ते माहिती अधिकार एक्सप्रेसचे उदघाटन



              जळगांव, दि. 6 :- राज्य शासनाकडून प्रतिवर्षी दि. 6 ते 12 ऑक्टोंबर या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येतो जिल्हयातील सर्व नागरिकांची माहिती अधिकाराबाबत प्रबोधन व्हावे या करिता जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते `माहिती अधिकार एक्सप्रेसचे `उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज सकाळी फित कापून व हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
        यावेळी पोलिस अधिक्षक एस.जयकुमार, दर्जी फाऊंडेशनचे गोपाल दर्जी, माहिती अधिकारी क्लिनीकचे आर.बी.पाटील, सौ. निवेदिता ताठे, चंदनमल राठी, श्रीकांत भुसारी, आदि उपस्थित होते.
            सदरच्या उदघाटनानंतर एक्सप्रेसमधील 6 वाहने ज्यावर माहिती अधिकार विषयी प्रबोधनपर माहिती दिलेली आहे व विदयार्थ्यांची शोभा यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून एस.पी.ऑफिस, जिल्हा परिषद मार्गे जाऊन तहसिल कार्यालयासमोर संपली. सदरच्या यात्रेमध्ये एम.जे.कॉलेजच्या अध्यापक विदयालय, ॲड. बाहेती कॉलेजच्या अध्यापक विदयालयाचे व दर्जी फाऊडेशनच्या सुमारे 200 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. या रॅलीचे आयोजन दर्जी फाऊंडेशन व माहिती अधिकार क्लीनीकचे संयुक्त विदयमाने करण्यात आले होते.
            या एक्सप्रेसच्या माध्यमातून जळगांव जिल्हयात माहिती अधिकारबाबत मार्गदर्शन व प्रबोधन  दि 6 ते 12 ऑक्टोंबर या कालावधीत केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment