जळगांव, दिनांक 3 :-
जिल्हयातील शासनाच्या विविध विभागांमार्फत महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची
सविस्तर माहिती सर्व विभाग प्रमुखांनी नोव्हेंबर अखेर होणाऱ्या समितीच्या बैठकीत
देण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली. ते आज सायंकाळी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा महिला सल्लागार समितीच्या
अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करत होते.
सदरच्या बैठकीस प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, राहुल मुंडके,
गणेश मिसाळ, तुकाराम हुळहुळे, महिला व बालविकास अधिकारी रविंद्र राऊत, जिल्हा
परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती राठोड, श्रीमती निवेदीता ताटे, सौ.
वासंती चौधरी, सौ. सीमा कुकावलकर समन्वय अधिकारी जीवन चौधरी आदि उपस्थित होते.
जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत जळगांव जिल्हयातील
विविध शासकीय विभागामार्फत महिलांसाठी ज्या विविध विकास योजना राबविल्या जातात
त्या योजनांचा आढावा घेणे, महिला धोरण 2001 च्या अनुषंगाने प्रत्येक विभागामार्फत
केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेणे व कौटूबिक हिंसाचारापासून महिलांचे
संरक्षण अधिनियम-2007 अंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेणे, हा जिल्हा
महिला सल्लागार समितीचा उददेश असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी देवेंद्र राऊत यांनी बैठकीत सांगितले.
जिल्हा महिला सल्लागार समितीची प्रथम बैठक जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये त्यांनी समितीची
दुसरी बैठक नोव्हेंबर अखेर घेण्याची सूचना करुन सदरच्या बैठकीस विविध विभागाच्या
प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत महिलांसाठी राबविण्या जाणाऱ्या योजनांची
सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले.
सदरच्या समितीत शासकीय व अशासकीय 28 सदस्य असून जिल्हाधिकारी
अध्यक्ष तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.
No comments:
Post a Comment