Saturday, 6 October 2012

जळगांवात होणा-या सैन्य भरती करिता प्रशासनाची तयारी सुरु



             जळगांव दि. 06 :- जिल्हयात दिनांक 30 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2012 या कालावधीत सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली असून सदरची भरती प्रक्रिया पोलिस कवायत मैदान व क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पाडली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली.
            यावेळी पोलिस अधिक्षक एस. जयकुमार, प्र. आयुक्त तथा अप्पर  जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लाळीकर, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, उपायुक्त भालचंद्र बेहरे, तहसिलदार कैलास देवरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी आदि उपस्थित होते.
            भरती ठिकाणी प्रशासनाकडून पाणी, झेरॉक्स्‍ काढणे, फोटोसाठी कक्ष आदि सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच समुपदेशन केंद्र  ही निर्माण केले जाणार आहे. भरतीस सुमारे 4 ते 5 हजार उमेदवार येण्याचा अंदाज असून त्या गर्दीवर नियंत्रणाकरिता पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केल्या.
            तसेच भरतीच्या ठिकाणी दलाल/एजंट यावर योग्य तो प्रतिबंध करुन सदरची प्रक्रिया निर्भीडपणे पार पाडण्याची पोलिस विभागाने दक्षता घेण्याची सूचना बैठकीत जिल्हाधिका-यांनी दिली.

No comments:

Post a Comment