जळगांव दि.12- जळगाव केंद्रावर माहे मे 2012 मध्ये घेण्यात
आलेल्या जी.डी.सी अँड ए परीक्षेचा निकाल सचिव,
जी.डी.सी.अँड ए परीक्षा बोर्ड ,द्वारा सहकार आयुक्त व निबंधक सहकार
संस्था,महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचेकडील दिनांक 28 सप्टेंबर 2012 रोजीचे
अधिसुचनेनुसार जाहीर झाला असून सदर परिक्षार्थिनी आपले गुणपत्रक/प्रमाणपत्र
11नोव्हेंबर 2012 पर्यंत (शासकीय सुटया वगळून) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
जळगाव यांचे कार्यालयातून घेवून जावेत.
परिक्षार्थिना गुणांची फेर तपासणी
करावयाची असल्यास फेर तपासणीची अंतीम मुदत 29ऑक्टोंबर 2012 अशी आहे.परिक्षार्थिनी
आपले गुणपत्रक / प्रमाणपत्र 11 नाव्हेंबर 2012 पर्यंत घेवून
न गेल्यास त्यांचे गुणपत्रके साध्या पोष्टाने पाठविण्यात येतील पोष्टाच्या
दिरंगाईमुळे प्रशिक्षणार्थ्याना गुणपत्रक / प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास याची
जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगांव यांचे कार्यालयावर राहणार नाही
याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हा उपनिबंधक सुनिल बनसोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment